बंगळुरु, दि. 18 -विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी प्रविण राव यांची तात्पुरती सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 18 ऑगस्टला झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत सिक्का यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
इन्फोसिसकडून पत्राव्दारे शेअर बाजाराला सिक्का यांच्या राजीनाम्याची माहिती कळवण्यात आली. सिक्का यांची इन्फोसिसमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी नुकतीच तीनवर्ष पूर्ण केली होती. कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती.
आणखी वाचा
इन्फोसिस करणार १0 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती
इन्फोसिस करणार संचालक मंडळाचा विस्तार
काय म्हणाले विशाल सिक्का
बरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले आहे. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला आहे.
Moving on...https://t.co/U3CJrtdz5c
— Vishal Sikka (@vsikka) August 18, 2017
इन्फोसिस करणार 20 हजार कर्मचा-यांची भरती
दोन महिन्यांपूर्वी इन्फोसिस 20 हजार कर्मचा-यांची भरती करणार असल्याची चर्चा होती. इन्फोसिस अनेक नोक-या निर्माण करत असून, तंत्रज्ञानात होत असलेल्या प्रगतीमुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
"कर्मचारी कपात करण्याबद्दल बोलायचं झाल्यास ते परफॉर्मन्सवर आधारित असून दरवर्षी हे केलं जातं. किमान 300 ते 400 कर्मचा-यांची कपात दरवर्षी होत असते. यावर्षीही ती करण्यता आली आहे", असं प्रवीण राव यांनी स्पष्ट केलं.
Vishal Sikka's resignation as Managing Director & Chief Executive
— ANI (@ANI) August 18, 2017
Officer of Infosys accepted, UB Pravin Rao appointed as Interim MD and CEO pic.twitter.com/nsGH1m54x5