देशाच्या मनोरंजन विश्वात एक मोठी डील झाली आहे. झी एन्टरटेन्मेंट (Zee EntertainmenT) ने सोनी पिक्चर्स (Sony India) इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचा करार केला आहे. Zee Entertainment (ZEEL) नेच याची माहिती दिली आहे. या व्यवहारानंतर देखील पुनीत गोयंका हे पुढील पाच वर्षे एमडी आणि सीईओ राहणार आहेत. (Zee Entertainment announces merger with Sony India)
झी मिडीया ही वेगळी कंपनी आहे, ती या व्यवहारात सहभागी नाही. Zee Entertainment ने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SPNI) हे विलिनीकरण केले आहे. करारावर स्वाक्षरीदेखील झाली आहे. या डीलनंतर सोनीकडे झीचे 52.93% समभाग असणार आहेत. तर ZEEL कडे 47.07 समभाग असणार आहेत.
या व्यवहारानुसार सोनी पिक्चर्समध्ये विलिनीकरण झाल्यानंतर सोनी झीमध्ये 11,500 कोटी रुपये गुंतविणार आहे. ZEEL च्या संचालक मंडळाने याला परवानगी दिली आहे. झीलने सांगितले की, केवळ आर्थिक गोष्टींचेच मुल्यांकन करण्यात आलेले नाही तर रणनीतिक व्हॅल्यूवरदेखील लक्ष देण्यात आले आहे.