Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण, पुन्हा एकदा मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण, पुन्हा एकदा मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली

जागतिक स्तरावर शेअर बाजारातील घसरणीसोबतच क्रिप्टोकरन्सी बाजारातही मोठी घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 08:28 PM2022-08-29T20:28:47+5:302022-08-29T20:29:02+5:30

जागतिक स्तरावर शेअर बाजारातील घसरणीसोबतच क्रिप्टोकरन्सी बाजारातही मोठी घसरण दिसून आली.

Big decline in cryptocurrency market once again market cap below 1 trillion dollars stock market crash | Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण, पुन्हा एकदा मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण, पुन्हा एकदा मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलर्सच्या खाली

जागतिक स्तरावर शेअर बाजारातील घसरणीसोबतच क्रिप्टोकरन्सी बाजारातही मोठी घसरण दिसून आली. सोमवारी सकाळच्या सुमारास क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप पुन्हा एकदा 1.18 टक्क्यांनी घसरून 1 ट्रिलियन डॉलर्सच्या खाली आला. सोमवारी त्याचं मूल्य 956.08 बिलियन डॉलर्स होतं.

Coinmarketcap च्या डेटानुसार, बिटकॉइनची किंमत 0.86 टक्क्यांनी घसरून 19,843.79 डॉलर्स इतकी झाली आहे. बिटकॉइन गेल्या 7 दिवसात 7.40 टक्क्यांनी घसरले आहे आणि पुन्हा एकदा 20,000 डॉलर्सच्या खाली व्यवहार करत आहे. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी इथेरियमची किंमत गेल्या 24 तासांत 2.76 टक्क्यांनी घसरून 1,452.70 डॉलर्सवर पोहोचली. गेल्या 7 दिवसात इथेरियमची किंमत 9.18 टक्क्यांनी घसरली आहे. मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 39.8 टक्के आहे, तर इथेरियमचे प्राबल्य 18.6 टक्के आहे.

वाढ कशात?
Coinmarketcap नुसार, Unifty (NIF), Bitsubishi (BITSU) आणि Hiroki (HIRO) या तीन डिजिटल करन्सीमध्ये ल्24 तासांत सर्वाधिक वाढ झाली आहे. या त्या क्रिप्टोकरन्सी आहेत ज्यांचे व्हॉल्यूम 50 हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे. युनिफ्टीमध्ये (NIF) गेल्या 24 तासांत 743.26 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

Web Title: Big decline in cryptocurrency market once again market cap below 1 trillion dollars stock market crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.