फ्लिपकार्टने (Flipkart) प्लस मेंबर्ससाठी आदल्या दिवशीच बिग बिलिअन डेज (Big Billion Days) सेल सुरु केला आहे. अॅमेझॉनही पुढील आठवड्यात ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) सेल सुरु करणार आहे. तर सामान्य ग्राहकांसाठी उद्यापासून फ्लिपकार्टवर सेल सुरु होणार आहे. तर अॅमेझॉनवर 17 ऑक्टोबरपासून सेल सुरु होईल. मंगळवारी रात्री अॅपलने आयफोन १२ लाँच केला आहे. यानिमित्ताने या सेलमध्ये आयफोनवर मोठ्या ऑफर सुरु झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात दोन ई-कॉमर्स कंपन्या मोठे सेल आणत आहेत.
आयफोन एसई iPhone (SE 2020)फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेज सेलमध्ये iPhone SE (2020) हा फोन 25999 रुपयांना सुरु आहे. भारतात हा स्मार्टफोन 42500 रुपयांना लाँच झाला होता. नुकतीय याची किंमत 2500 रुपयांनी कमी झाली आहे. या सेलमध्ये या फोनवर 14,000 वाचणार आहेत. 128GB आणि 128GB स्टोरेज या फोनमध्ये उपलब्ध आहेत. यांची किंमत 30,999 आणि 40,999 आहे.
आयफोन एक्सआर (iPhone XR)अॅपल आयफोन एक्सआर हा फोन दोन वर्षे जुने मॉडेल आहे. मात्र हा जगभरात चांगल्या खपाचा फोन आहे. बिग बिलिअन डेजमध्ये याची किंमत 37,999 पासून सुरु होते. टॉप व्हेरिअंट 42,999 रुपयांना आहे. याचबरोबर एसबीआय ग्राहकांना हा फोन आणखी स्वस्त मिळणार आहे. 1,750 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच सहा महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय देखील आहे.
आयफोन 11 प्रो (iPhone 11 Pro)अॅपलने गेल्या वर्षी आयफोन 11 प्रो लाँच केला होता. आज त्यावरही डिस्काऊंट मिळत आहे. आयफोन 11 प्रो हा स्मार्टफोन 79,999 रुपयांना असून फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेज सेलमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन 11 अॅमेझॉनवर the Amazon Great Indian Festival मध्ये आयफोन 11 हा 47,999 रुपयांना मिळणार आहे. याचबरोबर 2000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. यामुळे हा फोन 45,999 रुपयांनाच घेता येऊ शकतो. 128GB आणि 256GB व्हेरिअंटसाठी अॅमेझॉनने अद्याप किंमती जाहीर केलेल्या नाहीत. त्या उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे.