Lokmat Money > बिझनेस न्यूज > वस्तू उत्पादनात मोठी घसरण

वस्तू उत्पादनात मोठी घसरण

भारतातील वस्तूंच्या उत्पादनाने सप्टेंबरमध्ये गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. ‘निक्केई’च्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे.

By admin | Published: October 1, 2015 10:17 PM2015-10-01T22:17:03+5:302015-10-01T22:17:51+5:30

भारतातील वस्तूंच्या उत्पादनाने सप्टेंबरमध्ये गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. ‘निक्केई’च्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे.

Big fall in goods production | वस्तू उत्पादनात मोठी घसरण

वस्तू उत्पादनात मोठी घसरण

नवी दिल्ली : भारतातील वस्तूंच्या उत्पादनाने सप्टेंबरमध्ये गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. ‘निक्केई’च्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे.
कठीण आर्थिक परिस्थितीमुळे नवीन आॅर्डर कमी झाल्याने उत्पादन घटून निर्देशांक ५१.२ वर आला. आॅगस्टमध्ये हा आकडा ५२.३ होता. निर्देशांकाचा हा आकडा ५० च्या वर असेल, तर व्यवसायाचा विस्तार झाल्याचे समजले जाते. त्यापेक्षा कमी झाल्यास उत्पादन घटल्याचे ते द्योतक आहे.
या अहवालाच्या लेखक आणि अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी. लिमा म्हणाल्या की, नवीन कामात सतत भर पडत असली तरीही कठीण आर्थिक वातावरणाने सप्टेंबरमध्ये भारतात वस्तूंच्या उत्पादनावर दडपण आले. असे असले तरीही जुलै ते सप्टेंबर या काळातील वस्तू उत्पादन व वृद्धीची शक्यता उत्साहजनक आहे. पीएमआयच्या आकडेवारीचा विचार करता एप्रिल-जून या तिमाहीच्या तुलनेत पुढील तिमाहीत देशांतर्गत उत्पादनाचे योगदान जास्त राहील.
मूल्य स्थितीबाबत अहवालात म्हटले आहे की, उत्पादनाच्या क्षेत्रात सलग दुसऱ्या महिन्यात घसरण झाली. त्यामुळे आपल्या उत्पादनांच्या किमती घटवाव्या लागल्या. त्यातून स्पर्धा वाढली.

Web Title: Big fall in goods production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.