Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...

BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...

BSE Ltd Share Price : गेल्या काही दिवसांपासून बीएसई लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत होती. परंतु आता त्या घसरण झाली आहे. यामागे एक मोठं कारणदेखील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:56 AM2024-10-16T11:56:07+5:302024-10-16T11:56:07+5:30

BSE Ltd Share Price : गेल्या काही दिवसांपासून बीएसई लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत होती. परंतु आता त्या घसरण झाली आहे. यामागे एक मोठं कारणदेखील आहे.

Big fall in BSE Ltd shares rating downgraded by jefferies brokerage downgraded to underperform | BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...

BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...

BSE Ltd Share Price : गेल्या काही दिवसांपासून बीएसई लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत होती. परंतु आता त्या घसरण झाली आहे. यामागे एक मोठं कारणदेखील आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म जेफरीजनं बीएसईच्या शेअर्सचं रेटिंग 'होल्ड'वरून 'अंडरपरफॉर्म' केलं आहे. नजीकच्या काळातील रिस्क-रिवॉर्ड यांच्यातील फरक प्रतिकूल झाला असल्याचं ब्रोकरेजचं म्हणणं आहे. जेफरीजनं मात्र बीएसईच्या शेअरची टार्गेट प्राइस २,८५० रुपयांवरून ३,५०० रुपये प्रति शेअर केली आहे. १५ ऑक्टोबरला शेअरच्या बंद किमतीपेक्षा ही २६ टक्क्यांनी कमी आहे.

१६ ऑक्टोबर रोजी बीएसईचे शेअर्स रेड झोनमध्ये होते. हा शेअर मागील बंदच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी घसरला आणि ४,४८० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. बीएसईचे मार्केट कॅप आता ६५,००० कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. गेल्या महिनाभरात या शेअरमध्ये ३८ टक्क्यांची वाढ झाली. २०२४ मध्ये आतापर्यंत याच्या किंमतीत ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

'मूल्यांकन फुगवण्यात आलं'

बीएसईच्या शेअर्समध्ये नुकतीच झालेली तेजी मार्केट शेअरमध्ये वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे झाली आहे. सेबीची नवी एफ अँड ओ फ्रेमवर्क जारी झाल्यापासून या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. जेफरिजनुसार याचं मूल्यांकन फुगवून सांगण्यात आलं आणि एकूण बाजारावर एफ अँड ओ फ्रेमवर्कच्या उच्च परिणामामुळे उद्भवणारी जोखीम त्यात समजून घेण्यात अपयश आल्याचंही जेफरीजनं म्हटलंय.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Big fall in BSE Ltd shares rating downgraded by jefferies brokerage downgraded to underperform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.