Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत १८ ते २४ कॅरेटपर्यंतच्या सोन्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:01 PM2024-12-02T13:01:07+5:302024-12-02T13:02:15+5:30

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत १८ ते २४ कॅरेटपर्यंतच्या सोन्याचे दर

Big fall in gold and silver prices check the latest rates before buying for wedding season | Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या काळात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८७३ रुपयांनी कमी होऊन ७५,८६८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात आज १३३२ रुपयांनी वाढ झाली. तर दुसरीकडे आज चांदी ८८,०५१ रुपयांवर उघडली. २३ कॅरेट सोन्याचा भाव ८७० रुपयांनी कमी होऊन ७५,५६३ रुपये झाला. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ८०० रुपयांनी घसरून ६९,४९४ रुपये झालाय, तर १८ कॅरेट सोन्याचा भावही ६५५ रुपयांनी कमी होऊन ५६,९०० रुपये प्रति दहा ग्रॅम झालाय.

हे दर आयबीएनं जारी केलेले आहेत. यामध्ये जीएसटीचा दर लागू नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

दिल्लीत सोन्या-चांदीचे दर

लाइव्ह मिंटनुसार, सोमवार, २ डिसेंबर रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ७८,१३६ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्यात २६ तारखेला सोन्याचा भाव ७८७१३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज चांदीचा भाव ९४५०० रुपये प्रति किलो तर १ डिसेंबर ला ९४७०० रुपये होता.

चेन्नईत आज सोन्याचा दर

चेन्नईत आज सोन्याचा भाव ७७०११ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर रविवारी सोन्याचा दर ७८१४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्यात २६ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ७८५६१ रुपये होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १०२६०० रुपये प्रति किलो झालाय आणि काल १०२८०० रुपये प्रति किलो होता.

मुंबईत सोन्याचा दर

आज मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा भाव ७८०१७ रुपये आहे. रविवारी तो ७८१४७ रुपये होता आणि गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ७८५६७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९३८०० रुपये प्रति किलो तर काल ९४ हजार रुपये होता.

कोलकात्यात आज सोन्याचा दर

कोलकात्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८५१० रुपये आहे. काल त्याची किंमत ७८१४५ रुपये होती आणि गेल्या आठवड्यात ती ७८५६५ रुपये होती. कोलकात्यात आज चांदीचा भाव ९५३०० रुपये प्रति किलो झालाय. तर काल ९५५०० रुपये प्रति किलो होता.

Web Title: Big fall in gold and silver prices check the latest rates before buying for wedding season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.