Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट किंमत

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट किंमत

एमसीएक्स एक्सचेन्जवर आज (सोमवार) सकाळच्या सुमारास,  सोन्याचा भाव घसरणीसह ट्रेड करत होता. तसेच, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 02:08 PM2023-08-07T14:08:15+5:302023-08-07T14:08:42+5:30

एमसीएक्स एक्सचेन्जवर आज (सोमवार) सकाळच्या सुमारास,  सोन्याचा भाव घसरणीसह ट्रेड करत होता. तसेच, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे.

Big fall in gold price, silver also became cheap; Check frequently for the latest price | सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट किंमत

सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट किंमत

सोन्याच्या दरात विक्रमी घसरण दिसून येत आहे. सोने खरेदीचा विचार करणाऱ्या लोकांसाठी ही एक चांगली संधी असू शकते. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती. एमसीएक्स एक्सचेन्जवर आज (सोमवार) सकाळच्या सुमारास,  सोन्याचा भाव घसरणीसह ट्रेड करत होता. तसेच, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे.

भारतात सोन्याचा दर - 
भारतातील वायदा बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेन्ज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा दर 59550 रुपयांवर खुला झाला. सोन्याचा दर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी घसरणीसह 59411 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला होता. व्यापार सत्रादरम्यान  हा भाव 59402 रुपयांवर आला होता. गेल्या शुक्रवारी हा दर 59527 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्य मते सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण बघायला मिळू शकते. 

चांदीही  स्वस्त -
चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून येत आहे. आज चांदी 72280 रुपयांवर खुली झाली. यानंतर, चांदीचा दर 426 रुपये प्रति किलोग्रॅमच्या घसरणीसह 72052 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होता. यानंतर तो 72026 रुपयांवर आला. यापूर्वी, शुक्रवारी चांदीचा दर 72478 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, चांदीचा दर 70 हजार रुपयांवरही येऊ शकतो.

Web Title: Big fall in gold price, silver also became cheap; Check frequently for the latest price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.