Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी बुडाले

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी बुडाले

Sensex fall: सेन्सेक्सवर एकमेव कंपनी एशियन पेंट्सचे शेअर ग्रीन झोनवर बंद झाले. सर्वाधिक नुकसान बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे शेअर आहेत. या शेअरमध्ये 4 टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण नोंदविली गेली. 

By हेमंत बावकर | Published: October 15, 2020 04:28 PM2020-10-15T16:28:34+5:302020-10-15T16:48:36+5:30

Sensex fall: सेन्सेक्सवर एकमेव कंपनी एशियन पेंट्सचे शेअर ग्रीन झोनवर बंद झाले. सर्वाधिक नुकसान बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे शेअर आहेत. या शेअरमध्ये 4 टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण नोंदविली गेली. 

Big fall in Sensex today after 20 days; 3.30 lakh crore of investors sank | सेन्सेक्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी बुडाले

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 3.30 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली : जवळपास 20 दिवसांनंतर शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. 41 हजाराकडे वाटचाल करत असलेला सेन्सेक्स धाडकन खाली कोसळला. जवळपास 1000 अंकांनी घसरत सेन्सेक्स 39700 च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टीदेखील कोसळला असून 300 अंकांच्या घसरणीसह 11660 च्या स्तरावर गेला आहे. 


सेन्सेक्समध्ये आज 1066 अंकांची घसरण झाली. यामुळे आज सेन्सेक्स 39728 वर बंद झाला. तर निफ्टी 290 अंकांच्या घटीमुळे 11680 वर बंद झाला. ईटीच्या वृत्तानुसार गुंतवणूकदारांचे 3.3 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. BSE लिस्टेड कंपन्यांच मार्केट कॅप घटून 157.22 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. 


सेन्सेक्सवर एकमेव कंपनी एशियन पेंट्सचे शेअर ग्रीन झोनवर बंद झाले. सर्वाधिक नुकसान बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, टेक महिंद्रा आणि इंडसइंड बँकेचे शेअर आहेत. या शेअरमध्ये 4 टक्के आणि त्यापेक्षा जास्त घसरण नोंदविली गेली. 


अमेरिका लवकरच दुसऱ्या दिलासा पॅकेजची घोषणा करेल. मात्र, या शक्यतांवर पानी फिरले आहे. यामुळे बाजारात नकारात्मक संदेश गेला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु होते. अमेरिकी डिपार्टमेंट ऑफ स्टेटने एक प्रस्ताव दिला आहे. यामध्ये अलीबाबाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सूचना केली आहे. अलीबाबा सध्या आयपीओ आणण्याच्या प्रयत्नात आहे. 


गेल्या तीन आठवड्यांत शेअर बाजारात वाढ होत होती. 29 सप्टेंबर सोडल्यास 25 सप्टेंबरपासून सेन्सेक्स सलग वाढीनंतर बंद होत आहे. 24 सप्टेंबरला सेन्सेक्स 36553 च्या स्तरावर बंद झाला होता. 14 ऑक्टोबरला हा सेन्सेक्स 40794 च्या स्तरावर बंद झाला होता. गेल्या तीन आठवड्यांत यामध्ये 4200 हून अधिक अंकांची वाढ झाली होती. 

Web Title: Big fall in Sensex today after 20 days; 3.30 lakh crore of investors sank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.