Lokmat Money > बिझनेस न्यूज > Inflation: मोठा गेम झाला! कंपन्यांनी वस्तूंच्या किंमती तशाच ठेवल्या, वजनाचा काटा मारला

Inflation: मोठा गेम झाला! कंपन्यांनी वस्तूंच्या किंमती तशाच ठेवल्या, वजनाचा काटा मारला

Inflation in India: देशात महागाई सातत्याने वाढत आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला महाग झाले आहेत.  त्यामुळे कंपन्यांनी अनोखी युक्ती वापरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:52 AM2022-05-14T07:52:18+5:302022-05-14T07:52:23+5:30

Inflation in India: देशात महागाई सातत्याने वाढत आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला महाग झाले आहेत.  त्यामुळे कंपन्यांनी अनोखी युक्ती वापरली आहे.

Big game on Inflation! Companies kept commodity prices the same, hitting the weight cut | Inflation: मोठा गेम झाला! कंपन्यांनी वस्तूंच्या किंमती तशाच ठेवल्या, वजनाचा काटा मारला

Inflation: मोठा गेम झाला! कंपन्यांनी वस्तूंच्या किंमती तशाच ठेवल्या, वजनाचा काटा मारला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात महागाई सातत्याने वाढत आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला महाग झाले आहेत.  त्यामुळे कंपन्यांनी अनोखी युक्ती वापरली आहे. वस्तूंच्या किमती त्याच ठेवून वस्तूंचे वजन कमी केले आहे. या युक्तीमुळे कच्च्या मालाचा वाढता खर्च भरून निघाला असून आणि वस्तूंचे भावही स्थिर राहिले आहेत. 

खाद्य तेल, धान्य आणि इंधन यांच्या दरांत वाढ झाल्यानंतरही साबणापासून कुकीजपर्यंत अनेक उत्पादनांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी कंपन्यांनी हा फंडा वापरला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड आणि डाबर इंडिया लिमिटेड इत्यादी कंपन्यांचा त्यात समावेश आहे. हल्दिरामने आलू भुजियाच्या पॅकचे वजन ५५ ग्रॅमवरून ४२ ग्रॅम केले आहे. पारले-जी बिस्किटची किंमत ५ रुपये कायम ठेवताना वजन ६४ ग्रॅमवरून ५५ ग्रॅम करण्यात आले आहे. 

n बहुतांश कंपन्यांच्या ४० रुपयांच्या पॅकमध्ये २०० मि.लि. हँडवॉश यायचा, आता १७५ मि.लि. येतो.
n कोलगेटने १० रुपयांच्या पॅकमधील टूथ पेस्टचे वजन २५ ग्रॅमवरून 
१८ ग्रॅम केले आहे.
n १० रुपये किमतीचा कॅडबरी पॅक १५० ग्रॅमवरून १०० ग्रॅम झाला आहे. 
n ३० रुपयांच्या पॅकेटमध्ये १० 
सॅनिटरी पॅड यायचे, आता ७ पॅड येतात.
n पारले-जीच्या ५ रुपयांच्या पॅकेटमध्ये १३ बिस्किटे यायची, आता ११ येतात.

साबणाचे वजन कमी झाले
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य वित्त अधिकारी रितेश तिवारी यांनी अलीकडेच वस्तूंचे वजन कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, कंपनीच्या विम बारची किंमत १० रुपये इतकी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, वजन १५५ ग्रॅमवरून १३५ ग्रॅम करण्यात आले आहे.
 

Web Title: Big game on Inflation! Companies kept commodity prices the same, hitting the weight cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.