Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel च्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ, मुंबईत 5G वापरणाऱ्यांची संख्या २० लाखांवर

Airtel च्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ, मुंबईत 5G वापरणाऱ्यांची संख्या २० लाखांवर

संपूर्ण मुंबईत आपल्या ५ जी सेवा सुरू झाल्याची माहिती एअरटेलकडून देण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 10:22 PM2023-05-09T22:22:38+5:302023-05-09T22:24:54+5:30

संपूर्ण मुंबईत आपल्या ५ जी सेवा सुरू झाल्याची माहिती एअरटेलकडून देण्यात आली.

Big increase in Airtel s subscriber base 5G usage in Mumbai crosses 2 million | Airtel च्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ, मुंबईत 5G वापरणाऱ्यांची संख्या २० लाखांवर

Airtel च्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ, मुंबईत 5G वापरणाऱ्यांची संख्या २० लाखांवर

भारती एअरटेलनं काही महिन्यांपूर्वीच आपल्या 5G सेवांची सुरूवात केली आहे. यानंतर अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत कंपनीनं मुंबईत २० लाख ग्राहकांची संख्या पार केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. 

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या ठिकाणी एअरटेलची 5G सेवा उपलब्ध असल्याची माहिती कंपनीनं एका निवेदनाद्वारे दिली. याशिवाय आता एअरटेलची 5G सेवा देशभरातील ३५०० पेक्षा अधित शहरं आणि गावांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय देशभरात 5G नेटवर्कवर १० मिलियन पेक्षा अधिक ग्राहक जोडले असल्याची माहिती कंपनीनं दिली. तर दुसरीकडे २०२३ पर्यंत आपल्या 5G सेवेसह प्रत्येक गाव खेड्यातील भाग कव्हर करण्यासाठी काम सुरू असल्याचंही सांगण्यात आलं.

“२ मिलियनपेक्षा अधिक ग्राहक आमच्या 5G सेवांचा आनंद घेत आहेत. 5G सेवा पुरवणारी एअरटेल ही देशातील पहिली कंपनी असून मुंबईकरांना जलद इंटरनेटचा अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” अशी प्रतिक्रिया भारती एअरटेल मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर गुप्ता यांनी दिली.

 

 

Web Title: Big increase in Airtel s subscriber base 5G usage in Mumbai crosses 2 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल