नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून पुन्हा १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत नसल्याने इंधनाची विक्री करणाऱ्या कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला पत्र लिहून दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.
खासगी क्षेत्रातील जिओ-बीपी आणि नायरा एनर्जी या कंपन्यांना डिझेलच्या विक्रीवर प्रतिलिटर २० ते २५ रुपये आणि पेट्रोलवर १४ ते १८ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून सरकारने याबाबत तत्काळ पावले उचलण्याची विनंती केली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (एफआयपीआय)ने १० जून रोजी पेट्रोलियम मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सध्या मोठा तोटा होत असून, यामुळे या व्यवसायातील गुंतवणूक प्रंचड प्रमाणात कमी होईल. एफआयपीआय खासगी क्षेत्रातील कंपन्यांव्यतिरिक्त आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना सदस्य म्हणून मोजते.
कच्च्या तेलाच्या आणि त्याच्या उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय किमती दशकभराच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत; परंतु सरकारी इंधन विक्रेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ‘गोठवल्या’ आहेत. सध्या इंधनाचे दर खर्चाच्या दोन तृतीयांश इतकेच आहेत. त्याचा फटका खासगी कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे कंपन्यांसमोर किमती वाढवण्याचा किंवा ग्राहक गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पत्रात काय आहे? या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करावा, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे. एफआयपीआयने सांगितले की, खासगी क्षेत्रातील सर्व पेट्रोलियम विपणन कंपन्या रिटेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत; परंतु सध्या त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे गुंतवणुकीवर तसेच कामकाजावर परिणाम होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
म्हणून वाढला तोटाराज्य परिवहन उपक्रमांसारख्या मोठ्या प्रमाणात खरेदीदारांना विकल्या जाणाऱ्या इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतींनुसार वाढल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात घाऊक खरेदीदार किरकोळ दुकानांमधून खरेदी करत आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या तोट्यात भर पडत असल्याचे एफआयपीआयने म्हटले आहे.
१३७ दिवस म्हणजेच नोव्हेंबर २०२१ च्या सुरुवातीपासून ते २१ मार्च २०२२ दरम्यान निवडणुकांमुळे इंधन दरात वाढ करण्यात आली नाही.१४ वेळा त्यानंतर किरकोळ विक्री किमतीत प्रतिलिटर सरासरी ८० पैशांनी वाढ करण्यात आलीसरकारी तेल कंपन्याnइंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी)nभारत पेट्रोलियम कॉर्पो. (बीपीसीएल)nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन(एचपीसीएल)खासगी तेल कंपन्याnजिओ-बीपी nनायरा एनर्जी nशेल