मुंबई : इंडियन डेंटल असोसिएशनने अल फाजेर इन्फर्मेशन अँड सर्व्हिसेस या दोन संस्थांनी मिळून २२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान अरब इंटरनॅशनल डेंटल कॉन्फरन्स व एक्झिबिशन गल्फ डेन्टेक्स २०१८चे आयोजन अबूधाबीत करण्याचे ठरवले आहे.
या काळात दोन दिवस शास्त्रीय परिषदा व तीन दिवस प्रदर्शने होणार आहेत. व्यापार व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी हा शो महत्त्वाचा असेल. त्यातून मध्य-पूर्व देशांमधील दंतशल्य चिकित्सा क्षेत्रात ज्या वाढत्या गरजा आहेत, त्या पूर्ण करणे शक्य होणार आहे. यात ६०हूनही अधिक मान्यवर वक्ते तसेच १००० प्रतिनिधी हजर राहतील. प्रदर्शनात २५ देशांतून २५० कंपन्या सहभागी होतील, असे असे आयडीएचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.
>संकल्पनांची होणार देवाणघेवाण
जागतिक दंतशल्य क्षेत्र २०१६ मध्ये २५.४५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढे होते आणि २०२१ पर्यंत ते ३४.३५ अब्ज अमेरिकन डॉलर होणे अपेक्षित आहे. दंतशल्य क्षेत्राला चांगले भविष्य आहे. दंतशल्य क्षेत्रात नवीन वस्तू-सामग्री व तंत्रज्ञान गतीने विकसित होत आहे. आधुनिक उपचारांचे महत्त्व लक्षात घेता, गल्फ डेन्टेक्स २०१८मध्ये आम्ही या उद्योगातील सर्वोत्तम एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यातून संकल्पनांची देवाणघेवाण करणे शक्य होईल, असे फाजेर इन्फर्मेशन अँड सर्व्हिसेसचे सतीश खन्ना म्हणाले.
दंतचिकित्सा ही मोठी बाजारपेठ, भारतीय संस्थेने घेतला पुढाकार
इंडियन डेंटल असोसिएशनने अल फाजेर इन्फर्मेशन अँड सर्व्हिसेस या दोन संस्थांनी मिळून २२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान अरब इंटरनॅशनल डेंटल कॉन्फरन्स व एक्झिबिशन गल्फ डेन्टेक्स २०१८चे आयोजन अबूधाबीत करण्याचे ठरवले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:04 AM2018-03-17T01:04:49+5:302018-03-17T01:04:49+5:30