Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठी बातमी! रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांना मिळणार 'दिवाळी गिफ्ट'! असा आहे मुकेश अंबानींचा नवा प्लॅन

मोठी बातमी! रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांना मिळणार 'दिवाळी गिफ्ट'! असा आहे मुकेश अंबानींचा नवा प्लॅन

रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील सर्वात बलशाली कंपनी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:43 PM2023-07-07T21:43:22+5:302023-07-07T21:44:18+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील सर्वात बलशाली कंपनी आहे.

Big news 36 lakh shareholders of Reliance will get Diwali gift This is mukesh Ambani's new plan | मोठी बातमी! रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांना मिळणार 'दिवाळी गिफ्ट'! असा आहे मुकेश अंबानींचा नवा प्लॅन

मोठी बातमी! रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांना मिळणार 'दिवाळी गिफ्ट'! असा आहे मुकेश अंबानींचा नवा प्लॅन

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तब्बल 36 लाख शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षी दिवाळीपूर्वी त्यांना जबरदस्त गिफ्ट मिळू शकते. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची सप्टेंबरपर्यंत जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस (JFSL) लिस्ट करण्याच्या योजना आहे. यामुळे रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांसाठी व्हॅल्यू अनलॉक होईल. ही कंपनी कॅपिटलचा विचार करता देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी फायनॅन्शिअल कंपनी असेल. या कंपनीचा सामना थेट पेटीएम (Paytm) आणि बजाज फायनान्स (Bajaj Finance) सोबत असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील सर्वात बलशाली कंपनी आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मोर्गनच्या मते जिओ फायनॅन्शिअलचा  शेअर 189 रुपयांना असू शकतो. जेफरीजने याची किंमत 179 रुपये, तर सेंट्रम ब्रोकिंगने याची किंमत 157 ते 190 रुपयांपर्यंत असू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. जानकारांच्या मते अंबानी जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात रिलायन्स स्ट्रॅटजिक इनव्हेस्टमेंटची लिस्टिंग आणि अॅलॉटमेंटसाठी रेकॉर्ड डेटची घोषणा करू शकतात. या कंपनीचे नाव जेएफएसएल करण्यात येईल. कंपनीच्या एजीएममध्ये अंबानी यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ शकतात. कंपनीने अद्याप एजीएमची डेट जाहीर केलेली नाही.

कुठपर्यंत जाऊ शकतो शेअर -
जेपी मोर्गनने रिलायन्सच्या शेअरची टार्गेट प्राइस 2,960 रुपये एवढी ठेवली आहे. रिलायन्सचा शेअर शुक्रवारी 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 2635.45 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कंपनीने आपली बिझनस स्ट्रॅटजी आणि टार्गेट्सची घोषणा केल्यानंतर, रिलायन्सच्या शेअर्सची व्हॅल्यू वाढेल. डिमर्जर आणि लिस्टिंगपूर्वी रिलायन्सचे शेअर फोकसवर राहतील. कारण, रिलायन्सच्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर जिओ फायनॅन्शिअलचा एक शेअर मिळेल. 

गेल्या तीन महिन्यांत रिलायन्सचा शेअर 13 टक्क्यांनी वधारला आहे. मार्केट व्हेटरन देवेन चोकसी म्हणाले, ही कंपनी 1,50,000 कोटींच्या नेटवर्थपासून सुरुवात करत आहे. एनबीएफसीची दिग्गज कंपनी बजाज फायनान्सची नेटवर्थ 44,000 कोटी रुपये एवढी आहे.

Web Title: Big news 36 lakh shareholders of Reliance will get Diwali gift This is mukesh Ambani's new plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.