Lokmat Money > बिझनेस न्यूज > GPay बाबत मोठी बातमी आली समोर, जूनपासून 'या' ठिकाणी सेवा होणार बंद 

GPay बाबत मोठी बातमी आली समोर, जूनपासून 'या' ठिकाणी सेवा होणार बंद 

गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरलं जाणारं ॲप आज लोकांची पहिली पसंती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:19 PM2024-02-24T12:19:25+5:302024-02-24T12:19:49+5:30

गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरलं जाणारं ॲप आज लोकांची पहिली पसंती आहे.

big news about online payment app GPay the service will be stopped in america from June | GPay बाबत मोठी बातमी आली समोर, जूनपासून 'या' ठिकाणी सेवा होणार बंद 

GPay बाबत मोठी बातमी आली समोर, जूनपासून 'या' ठिकाणी सेवा होणार बंद 

गुगल पे ॲप हे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरलं जाणारं ॲप आज लोकांची पहिली पसंती आहे. हे भारत, सिंगापूर आणि अमेरिका इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. पण आता कंपनीनं या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुनं गुगल ॲप बंद करणार आहे. अँड्रॉईड होमस्क्रीनवर दिसणारं 'GPay' ॲप हे जुनं व्हर्जन आहे जे पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरलं जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीनं हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे.
 

गुगलनं ब्लॉगद्वारे दिली माहिती
 

रिपोर्टनुसार, GPay ४ जून २०२४ पासून अमेरिकेत काम करणं बंद करेल. दरम्यान, भारत आणि सिंगापूरमध्ये GPay वापरणाऱ्या लोकांना काळजी करण्याची गरज नाही कारण ते दोन्ही ठिकाणी पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, ४ जूनपासून स्टँडअलोन Google Pay ॲपचं अमेरिकन व्हर्जन वापरता येणार नाही. अमेरिकेत ही सेवा बंद केली जाईल, मात्र भारत आणि सिंगापूरमध्ये ही सेवा सुरू राहतील, अशी माहिती कंपनीनं एका ब्लॉगद्वारे दिली आहे.
 

पीअर टू पीअर पेमेंट बंद
 

गुगलनं पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केलं आहे. ब्लॉगमध्ये असं सांगण्यात आलंय की, अमेरिकेत गुगल पे ॲप बंद झाल्यानंतर अमेरिकन यूजर्स यापुढे ॲपद्वारे इतर लोकांना पैसे पाठवू किंवा घेऊ करू शकणार नाहीत. अमेरिकेतील Google Pay युझर्सना कंपनीनं Google Wallet ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे. ते आपल्या युझर्सना वेळोवेळी अपडेट देत राहील, असंही कंपनीनं म्हटलंय.

Web Title: big news about online payment app GPay the service will be stopped in america from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.