स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI च्या जवळपास 46 कोटी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर आपण SBI चे ग्राहक असाल आणि मोठ्या प्रमाणावर बँकेच्या सेवांचा लाभ घेत असाल, तर बँक वर्षातून एकदा आपल्या बचत खात्यातून काही पैसे कापते. ही रक्कम 147.5 रुपये, 206.5 रुपये अथवा 295 रुपये एवढी असू शकते.
का कापले जातात पैसे - खरे तर खात्यातून 206.5 रुपये डेबिट झालेले आपण एकमेव ग्राहक नाही, तर अनेक ग्राहकांच्या खात्यातून ही रक्कम कापली गेली आहे. भारतीय स्टेट बँक युवा, गोल्ड, कॉम्बो अथवा माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्ड इत्यादींचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या बचत खात्यातून 206.5 रुपये कापते.
एसबीआय युवा डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड (इमेज) डेबिट/एटीएम कार्डपैकी कुठल्याही डेबिट/एटीएम कार्डचा वापर करणाऱ्या लोकांकडून वार्षीक मेंटन्सच्या स्वरुपात 175 रुपये घेतले जातात. कारण अशा प्रकारच्या देवाण-घेवाणीवर 18% GST देखील लागू आहे. यामुळे यावर 31.5 रुपयांचा (175 रुपयांचे 18%) GST ही जोडण्यात आला आहे. असे 175 रुपये + 31.5 रुपये = 206.5 रुपये होता.