Join us

खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये खातं असलेल्यांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्सची डोकेदुखी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 4:13 PM

बँक खात्यात मिनिमम बॅलन्स मेन्टेट करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Minimum Balance in Bank Account: तुमच्या बँक खात्यातील किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल तुम्हाला कधी दंड भरावा लागला आहे का? तुमच्याकडे कदाचित उत्तर होय असेल. जर असे असेल आणि येणाऱ्या काळात सर्वकाही सुरळीत राहिले तर बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची गरजही भासणार नाही. वेगवेगळ्या बँकांच्या बचत आणि चालू खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वेगवेगळी असते. गेल्या काही दिवसांत केंद्राकडे जन-धन खाती उघडण्याच्या मोहिमेदरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. जन धन खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही.

खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बँकांचे संचालक मंडळ किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खात्यांवरील दंड माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे कराड म्हणाले. कराड एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले - बँका या स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचे संचालक मंडळ दंड माफ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते कराडमाध्यमांनी कराड यांना किमान बॅलन्स मेंटेन करण्याबाबत प्रश्न विचारला होता. केंद्र सरकार बँकांना यबाबात निर्देश देणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरमधील विविध आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वित्त राज्यमंत्री केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील बँकांनी गेल्या काही वर्षांत चांगले काम केले आहे. तसेच तसंच काही गोष्टींवर आपली कामगिरी सुधारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :बँकडॉ. भागवतजम्मू-काश्मीर