Join us

BSNL 5G : BSNLच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! २०२५च्या 'या' महिन्यापासून सुरू होणार 5G; सरकारनं काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:03 AM

BSNL 5G and 4G Service Launch Date: बीएसएनएलचे ग्राहक ४जी आणि ५जी सेवा येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीएसएनएलची ४जी आणि ५जी सेवा सुरू करण्याची तारीख आता सरकारनं सांगितली आहे.

BSNL 5G and 4G Service Launch Date: बीएसएनएलचे ग्राहक ४जी आणि ५जी सेवा येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीएसएनएलची ४जी आणि ५जी सेवा सुरू करण्याची तारीख आता सरकारनं सांगितली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुढील वर्षी मे पर्यंत एक लाख बेस स्टेशनच्या माध्यमातून देशात विकसित केलेल्या ४जी तंत्रज्ञान लागू करण्याचं काम पूर्ण करेल. त्यानंतर कंपनी जून २०२५ पर्यंत ५जी नेटवर्कवर जाईल, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी सांगितलं.

जून २०२५ पर्यंत ५जी लाँच करणार

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी यांदर्भातील माहिती दिली. भारत ४जी मध्ये जगाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे आणि ५जी मध्ये जगासोबत वाटचाल करत आहे. तसंच ६जी मध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल. सरकारी कंपनी दुसऱ्याची उपकरणं वापरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

"आमच्याकडे आता एक प्रमुख आणि रेडिओ अॅक्सेस नेटवर्क आहे, जे पूर्णपणे कार्यान्वित आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे पर्यंत एक लाख साइट्सची आमची योजना आहे. आम्ही कालपर्यंत ३८,३०० साइट्स अॅक्टिव्हेट केल्या आहेत. आम्ही आमचं स्वतःचं ४जी नेटवर्क सुरू करणार आहोत, जे जून २०२५ पर्यंत ५जी वर जाईल. अशी कामगिरी करणारा आपला जगातील सहावा देश असेल," असंही ज्योतिरादित्य शिंदे यानी नमूद केलं.

इतक्या ग्राहकांचं टार्गेट

बीएसएनएलनं २०२५ च्या अखेरपर्यंत २५ टक्के ग्राहक आपल्यासोबत जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. बीएसएनएलनं ६ ऑगस्ट रोजी ४जी आणि ५जीवर काम करणारं 'ओव्हर-द-एअर' (ओटीए) आणि युनिव्हर्सल सिम (यूएसआयएम) प्लॅटफॉर्म सादर करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक निवडण्यासोबतच भौगोलिक निर्बंधांशिवाय सिम बदलता येणार आहे. बीएसएनएल ही भारत ही सरकारी मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

टॅग्स :बीएसएनएल