Join us  

India Post Payment Bank : 'या' बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी; खातं बंद झाल तर लागणार शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 6:20 PM

India Post Payment Bank : पाहा कधीपासून लागू होणार नियम, किती आहे शुल्क?

India Post Payment Bank : तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये बचत खाते (Saving Account) उघडले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. IPPB ने डिजिटल बचत खाते बंद करण्यासाठी (Digital Savings Account) शुल्क लागू केले आहे. हे शुल्क 150 रुपये अधिक जीएसटी इतके असेल. नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. IPPB नुसार, KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत खाते एक वर्षानंतर बंद झाल्यासच हे शुल्क लागू होईल. त्याच वेळी सामान्यरित्या खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 1 फेब्रुवारी 2022 पासून कमी केले आहेत. IPPB ने बचत खात्यांवरील व्याजदर 0.25 टक्क्यांपर्यंत कमी केले. तसेच बचत खात्यातील 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर सध्याचा व्याज दर वार्षिक 2.50 टक्के आहे. मात्र आता तो 2.25 टक्के इतका करण्यात आला आहे.

IPPB ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले असल्याचे सर्वाना सुचित केले असल्याचे इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे शुल्क 150 रुपये + GST ​​असेल आणि 5 मार्च 2022 पासून हे शुल्क आकारले जाईल. KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत बँक (DGSB) खाते एका वर्षाच्या शेवटी बंद झाले तरच शुल्क लागू होईल. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही IPPB अॅक्सेस पॉईंटला भेट देऊन एका वर्षाच्या आत तुमचे डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड करा, असं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलेय.

डिजिटल सेव्हिंग बँक अकाउंटडिजिटल बचत बँक खाते खाते 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे आधार आणि पॅन कार्ड आहे ती सुरू करू शकते. यामध्ये मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते.

टॅग्स :पोस्ट ऑफिसपैसा