Join us

LIC च्या शेअरधारकांसाठी महत्वाची बातमी; तात्काळ अपडेट करा PAN अन् बँक डिटेल्स, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 4:20 PM

बँक डिटेल्स आणि पॅन अपडेट न केल्यास मोठे नुकसान होईल.

LIC Shares : देशातील सरकारी विमा कंपनी, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) त्यांच्या भागधारकांसाठी (Shareholders) एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. एलआयसीने त्यांच्या भागधारकांना PAN आणि बँक तपशील लवकरात लवकर अपडेट करण्यास सांगितले आहे. LIC ने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत ही माहिती दिली आहे.

LIC ने म्हटले की, सर्व भागधारकांनी लक्षात घ्यावे की, एलआयसीच्या संचालक मंडळाने 27 मे 2024 रोजी झालेल्या बैठकीत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रु. 10 चे दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 6 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. याची घोषणा महामंडळाच्या सदस्यांद्वारे गुरुवारी, 22 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली जाईल.

LIC च्या लाभांशाची रेकॉर्ड तारीख 19 जुलै 2024 आहे. फिजिकल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इक्विटी शेअर्स असणाऱ्या सर्व भागधारकांना लाभांश दिला जाईल. लाभांश घोषित केल्यापासून 30 दिवसांच्या आत किंवा 20 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र सदस्यांच्या खात्यावर पेमेंट पाठवले जाईल.

आयकर कायदा 1961 नुसार, लाभांशातून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे. त्यामुळे एलआयसीने त्यांच्या भागधारकांना आयटी कायद्यानुसार त्यांचा पत्ता, पॅन आणि बँक तपशीलांसह सर्व माहिती त्यांच्या डीपीसह अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 19 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 05:00 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय