नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (National Pension System) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. वास्तविक, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA नं एनपीएस (NPS) अंतर्गत निधी काढण्यासाठी भागधारकांसाठी 'पेनी ड्रॉप' (Penny Drop) व्हेरिफिकेशन अनिवार्य केलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांचं वेळेवर हस्तांतरण सुनिश्चित होणार आहे.
'पेनी ड्रॉप' प्रक्रियेअंतर्गत, सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीज (CRAs) बँक बचत खात्याची सक्रिय स्थिती पाहतात आणि बँक खाते क्रमांक आणि 'कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक' (Permanent Retirement Account Number) किंवा दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये दिलेले नाव यांच्याशी जुळवून पाहतात. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या तरतुदी एनपीएस, अटल पेन्शन योजना (APY) आणि एनपीएस लाईटमधील (NPS Lite) सर्व प्रकारचे पैसे काढण्यासाठी तसंच ग्राहकांच्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये बदल करण्यासाठी लागू होणार आहेत.
काय आहे Penny Drop व्हेरिफिकेशन?
लाभार्थीच्या बँक खात्यात थोडी रक्कम जमा करून आणि पेनी ड्रॉप प्रतिसादाच्या आधारे नावाची जुळवणी करून टेस्ट ट्रान्झॅक्शन करून खात्याची वैधता व्हेरिफाय केली जाते. पीएफआरडीएच्या एका नोटिफिकेशननुसार नावाची जुळवून पाहण्यासाठी, पैसे काढण्यासंबंधी अर्ज आणि ग्राहकांच्या बँक अकाऊंटच्या तपशीलात बदल करण्यासाठी पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन यशस्वी होणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय.
NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढण्याच्या नियमांत बदल; जाणून घ्या
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 09:26 AM2023-10-30T09:26:24+5:302023-10-30T09:27:01+5:30