Currency News Update : सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदी केली होती. यात १ हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात आल्या होत्या. आता बाजारात १००० रुपयांच्या जुन्या नोटेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सरकार १,००० रुपयांची नोट पुन्हा सुरू करू शकते. नोटाबंदीच्यावेळी भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने ही १००० रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अशा नोटांवर बंदी घातली होती. मात्र, आता सरकार पुन्हा एकदा १००० रुपयांची नोट चलनात आणणार असल्याचे बोलले जात आहे.
नोटाबंदीच्या काळात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अचानक झालेल्या नोटाबंदीमुळे लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर लांबच लांब रांगांमध्ये उभे राहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. अलीकडच्या काळात अचानक २००० रुपयांच्या नोटा बाजारात येण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
Air India साठी Tata चा मास्टरप्लान, सरकारी पैशानंच फेडणार सरकारकडून घेतलेलं कर्ज!
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ च्या आकडेवारीनुसार, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण नोटांच्या हे प्रमाण १.६ टक्के आहे. सध्या ४,२८,३९४ कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. मूल्यानुसार, १३.८% नोटा आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून देशात ५०० आणि १००० रुपयांच्या चलनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यानंतर लोकांना बँकेतून नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आली होती.