नवी दिल्ली : आयआरसीटीसीच्या चार कोटी युजर्ससाठी दिलासा देणारी मोठी बातमी आहे. आपल्याला तिकिट रिफंडबाबत माहिती मिळवणे, पीएनआरचे स्टेटस पाहणे किंवा ट्रेनची माहिती मिळवणे असो. अशा सर्व प्रश्नांसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण याचे उत्तर आता त्वरित मिळणार आहे.
आयआरसीटीसीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून (Artificial Intelligence) चॅट बॉटचे अपडेट व्हर्जन लाँच केले आहे. आयआरसीटीसीने वेबसाइट आणि अॅपवर एक चॅट बॉटचा ऑप्शन तयार केला आहे, ज्यामध्ये प्रवासी कोणत्याही प्रकारचे प्रश्न टाइप करू शकतात, जर ते टाइप करू शकत नाहीत तर ते विचारू शकतात.
अशा पद्धतीने होईल फायदा
आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, रिफंड किंवा तिकिटाशी संबंधित सर्व माहितीसाठी आधी मेल पाठवावा लागत होता आणि उत्तराची वाट पहावी लागली होती, पण आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे उत्तर त्वरित प्राप्त होईल. यासाठी आयआरसीटीसी आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने मशीन लर्निंग प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.
दररोज १० लाख क्वेरिज
रेल्वेशी संबंधित माहितीसाठी सुमारे 10 लाख क्वेरी प्राप्त होत आहेत. यासाठी प्रवाशांना १३९ या नंबरवर फोन, एसएमएस किंवा मेल करावे लागेल. आता प्रवाशी आयआरसीटीसीच्या चॅट बॉटवरही क्वेरी विचारू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे कामाचे ओझे कमी होईल.
खासियत
>> चॅट बोर्ड २४ तास काम करेल, अनेक प्रश्न विचारू शकता.
>> उत्तरासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
>> सध्याच्या वेळेच्या ऑपरेशन्समध्ये वापरलेला रिसोर्स सेव्ह होईल. तसेच तो पुन्हा पाहता येणार आहे.
आयआरसीटीसीने वेबसाइटमध्ये केला बदल
दरम्यान, आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटमध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, जेणेकरुन ते युजर्ससाठी अनुकूल बनू शकेल. जुन्या वेबसाइटबद्दल अनेक लोक सोशल मीडियावर तक्रारी करत असत. हे लक्षात घेऊन सरकारने आज नवीन आयआरसीटीसीची वेबसाइट लाँच केली आहे. नवीन वेबसाइटमध्ये पेमेंट पेज आधीपेक्षा सुधारित करण्यात आले आहे, कारण पेमेंटचा पर्याय निवडणे सुलभ होईल.