Join us

रिलायन्स कॅपिटल संदर्भात मोठी बातमी; IIHL ने संपादनाच्या दिशेने टाकले मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 4:15 PM

आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी कर्जदारांना २७५९ कोटी रुपये मिळाले आहेत.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज (IIHL) ही कंपनी रिलायन्स कॅपिटल घेणार आहे, त्यांनी २७५९ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  न्यायालयाच्या निर्देशानुसार इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सने हस्तांतरित केलेली रक्कम शनिवारी सकाळी प्राप्त झाली. IIHL ने बंधनकारक पत्रक देखील प्रदान केले आहे. यामध्ये व्यवहार पूर्ण करण्यासाठी घ्यायच्या कर्जाची माहिती असते. या आठवड्यात गुरुवारी, एनसीएलटीच्या दोन सदस्यीय खंडपीठाने आयआयएचएलला १० ऑगस्टपर्यंत पैसे भरण्याचे निर्देश दिले होते. हे पैसे कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने ठरवलेल्या एस्क्रो खात्यात जमा केले आहेत.

तुम्ही SIP'च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा

या महिन्याच्या पहिल्या दिवशी, रिलायन्स कॅपिटलला कर्ज देणाऱ्या बाँड ट्रस्टी Vistra ITCL ने हिंदुजा समूहाला २७५० कोटी रुपये जमा न केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.

'Esro खात्याबद्दल माहिती नसल्यामुळे पैसे त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले, असा  आयआयएचएलने दावा केला होता.

Vistra नुसार, NCLT ने 23 जुलै रोजी निर्देश दिले होते की कंपनीने सादर केलेल्या योजनेनुसार 250 कोटी रुपये देशांतर्गत खात्यात हस्तांतरित करायचे आहेत. तर 2500 कोटी रुपये एस्क्रो खात्यात हस्तांतरित करायचे होते. व्यवहार पूर्ण करण्यासाठी कंपनीला 7,300 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी मुदत पत्रक देखील सादर करावे लागेल.

IIHL ने रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी ९८६१ कोटी रुपयांची बोली लावली होती. याला बहुतेक कर्जदारांनी गेल्या जूनमध्येच सहमती दर्शवली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कॅपिटलला दिवाळखोरीसाठी संदर्भित केले होते. कंपनीवर एकूण २३,६६६ कोटी रुपयांचे कर्ज होते.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स