Join us

1000 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी बातमी, तुमच्या जवळही असेल तर मिळतील पूर्ण 3 लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 4:24 PM

नाणे आणि नोटा दुर्मीळ झाल्या, की त्यांना जबरदस्त किंमत मिळते. कॉइन्स आणि नोटा जमवण्याचा छंद असलेले लोक मूळ किंमतीपेक्षाही अधिक पैसे देण्यासाठी तयार असतात.

नाणी आणि नोटांसंदर्भात सातत्याने विविध प्रकारच्या बातम्या समोर येत असतात. पण आपण नोटांच्या माध्यमाने पैसा कमवण्याचा विचार करत असाल तर, आपल्याला 1000 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात पूर्ण 3 लाख रुपये मिळतील. तर जाणून घ्या, आपण कशा प्रकारे हा पैसा कमवू शकता.

1000 पटहून मिळतेय अधिक किंमत - नाणे आणि नोटा दुर्मीळ झाल्या, की त्यांना जबरदस्त किंमत मिळते. कॉइन्स आणि नोटा जमवण्याचा छंद असलेले लोक मूळ किंमतीपेक्षाही अधिक पैसे देण्यासाठी तयार असतात. इंग्लंडमध्ये अशा चलनाची युनीक सीरयल नंबर आणि काही ऐतिहासिक महत्व असल्यास अविश्वसनीय किंमतीला विक्री होत आहे. एका नाण्याची अथवा कॉइनची किंमत तर 1000 पट अधिक ठेवण्यात आली आहे.

'डेलीस्‍टार'ने दिलेल्या एका वृत्तात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, नाण्यांशिवाय, 10 पाउंडच्या (1000 रुपये) नोटेस पूर्ण 3 लाख रुपये देण्यात येत आहेत. यातही जर कुणाकडे 10 पाउंडची AH17 75 सीरयल नंबर असलेली नोट असेल, तर सध्या हिची किंमत 3.5 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. याशिवाय जर आपल्याकडे डबल क्‍वीन हेड असलेली 50 पेंस (50 रुपये) चे नाणे असेल, तर 1000 रुपयापेक्षाही अधिक किंमत मिळू शकते. तसेच, क्यू गार्ड्स असलेले नाणेही गेल्या महिन्यात 17,000 रुपयांना विकले गेले होते.

20 रुपयांचे नाणे 75 हजार रुपयांना... -याशिवाय, यात तांब्याच्या 20 पेंस (साधारणपणे 20 रुपये) या ब्रिटिश नाण्याचाही समावेश आहे. या नाण्याची किंमत 75 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी, 20 पेंसचे नाणे 2011 मध्ये eBay वर 15 हजार रुपयांना विकले गेले होते.

टॅग्स :पैसाव्यवसाय