Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा

SBI New Timing : यापूर्वी बँकेत फक्त काही तास (SBI working hours)काम केले जात होते, आता ते वाढवून सहा तास करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:24 PM2021-06-02T12:24:42+5:302021-06-02T12:28:38+5:30

SBI New Timing : यापूर्वी बँकेत फक्त काही तास (SBI working hours)काम केले जात होते, आता ते वाढवून सहा तास करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

big news for sbi customers bank change his working hours from 1 june 2021, check sbi timings | SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा

Highlights1 जूनपासून देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत काम करेल. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असल्यास बँकिंगच्या कार्यासाठी तुम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत शाखेत भेट देऊ शकता.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक बँकांनी आपल्या कामाचे तास (Bank branche time) कमी केले आहेत, मात्र 1 जूनपासून राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. हे पाहता स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of india) आपले कामकाजाचे तास वाढविले आहेत. जर तुम्हालाही येत्या काही दिवसांत बँकेत जायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यापूर्वी बँकेत फक्त काही तास (SBI working hours)काम केले जात होते, आता ते वाढवून सहा तास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. (big news for sbi customers bank change his working hours from 1 june 2021, check sbi timings)

1 जूनपासून देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत काम करेल. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असल्यास बँकिंगच्या कार्यासाठी तुम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत शाखेत भेट देऊ शकता. आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे बँकेने कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जून 2021 पासून बँकेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरद्वारे माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ग्राहकाने केलेल्या ट्विटला उत्तर म्हणून बँकेने याबाबत माहिती दिली आहे. ज्यावेळी संबंधित ग्राहकाने बँकेकडे शाखेची वेळ विचारली, त्यावेळी बँकेने सांगितले की ग्राहक त्यांच्या बँकेशी संबंधित काम सकाळी दहा ते संध्याकाळी चार दरम्यान करू शकतील. 1 जून 2021 रोजी बँकेने ट्विमध्ये लिहिले आहे की, आमच्या सर्व शाखा सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत खुल्या असतील.

रोख पैसे काढण्याचे नियम बदलले
याचबरोबर, अलीकडेच  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक अधिसूचना जारी केली होती आणि रोख रक्कम काढण्यासाठीच्या नवीन नियमांविषयी सांगितले होते. बँकेने आपल्या शाखांमध्ये नॉन-होम थर्ड पार्टी रोख रक्कम काढण्यास देखील परवानगी दिली आहे. यामुळे जे ग्राहक कोणत्याही कारणास्तव रोख रक्कम काढण्यासाठी त्यांच्या गृह शाखेत जाऊ शकत नाहीत, त्यांना दिलासा मिळेल.


कोरोनाग्रस्तांना मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत Personal Loan
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना स्वस्तात पाच लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज (Personal Loan)काढता येईल. देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने असा निर्णय घेतला आहे. बँकेने या कर्ज सेवेला कोविड पर्सनल लोन (Covid Personal Loan) असे नाव दिले आहे. या कर्जाची विशेष बाब म्हणजे याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी देण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या संकटकाळात उपचार करण्यासाठी कुणालाही पैशांची चणचण भासू नये, याकरता एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते पगारदार, पगार नसणारे आणि निवृत्तीवेतनधारकांना कोरोना उपचारांसाठी 25000 ते पाच लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.



 

Web Title: big news for sbi customers bank change his working hours from 1 june 2021, check sbi timings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.