Join us  

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन बँकिंगसाठी नवीन फीचर लाँच, जाणून घ्या काय होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 9:29 PM

SBI : सिम बाइंडिंग फीचर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्म YONO आणि YONO Lite साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगचा अनुभव मिळेल, असे आशुतोष कुमार सिंह म्हणाले.

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) संख्येत वाढ झाल्यामुळे आजही ऑनलाइन फसवणुकीमध्येही पूर्वीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ऑनलाइन बँकिंग सेवेमध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरून ऑनलाइन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. ऑनलाइन फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो लाइट अॅपमध्ये (YONO Lite App) बदल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य डिजिटल अधिकारी आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, यासाठी सिम बाइंडिंग फीचर लाँच करण्यात आले आहे. (big news for sbi customers sim binding feature launched for online banking)

फक्त एका डिव्हाइसवर करता येईल लॉगइनसिम बाइंडिंग फीचर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्म YONO आणि YONO Lite साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन सुविधेद्वारे ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगचा अनुभव मिळेल, असे आशुतोष कुमार सिंह म्हणाले. तसेच, आता ऑनलाइन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहे. यासाठी ग्राहकांना लेटेस्ट YONO लाइट अॅप डाउनलोड करावे लागेल. सिम बाइंडिंग फीचरद्वारे रजिस्टर्ड मोबाईलवरून फक्तत एकाच डिव्हाइसवर लॉग-इन (Single Device Log-In) करता येते. यामुळे ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. अॅप अपडेट करण्याबरोबरच ग्राहकांना वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेस देखील पूर्ण करावी लागेल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

असे करा अॅक्टिव्हेट SBI YONO Lite अॅपGoogle Play Store वरून SBI YONO Lite अॅप डाउनलोड करा आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर निवडा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. यामध्ये तुम्हाला Proceed वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये दिलेला कोड अपलोड करा. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे नाव आणि पासवर्ड टाका. नंतर नियम आणि अटी स्वीकारल्यानंतर ओके बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक अॅक्टिव्हेशन कोड मिळेल. हा कोड 30 मिनिटांसाठी अॅक्टिव्ह असेल. अॅपमध्ये हा कोड टाकल्यानंतर अॅक्टिव्हेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुम्ही YONO लाइट अॅप वापरू शकाल.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयबँकतंत्रज्ञानव्यवसाय