Join us

SBIच्या 42 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी! लवकरच बदलणार ATMमधून पैसे काढण्याचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:41 AM

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या SBIमध्ये जर आपलं खातं असल्यास एक महत्त्वाची  बातमी आहे.

ठळक मुद्दे देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या SBIमध्ये जर आपलं खातं असल्यास एक महत्त्वाची  बातमी आहे. आरबीआयनं एटीएम कार्डमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.ग्राहकांच्या खात्यातील पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्लीः देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या SBIमध्ये जर आपलं खातं असल्यास एक महत्त्वाची  बातमी आहे. आरबीआयनं एटीएम कार्डमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. ग्राहकांच्या खात्यातील पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. 2020च्या सुरुवातीपासून SBIच्या एटीएममधून कॅश काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.  SBIच्या ग्राहकांना चांगली बँक सुविधा (Bank Facility) आणि एटीएम व्यवहारातील फसवणूक(Fraud ATM Transaction) यांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. बँकेनं वन टाइम पासवर्ड आधारित पैसे काढण्याची यंत्रणा सुरू केली आहे. याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येणार आहे. हा नियम 10 हजारांहून अधिकची रक्कम काढणार असल्यास लागू होणार आहे. RBIचा नवा नियमरिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम जारी केले आहेत. भारतात बँकांनी कार्ड जारी करताना एटीएम आणि PoSवरच डोमेस्टिक कार्डची परवानगी द्यावी, असंही आरबीआयनं सुचवलं आहे.  तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशांची देवाण-घेवाण करायची असल्यास वेगळी मंजुरी घ्यावी लागेल. त्याशिवाय ऑनलाइन देवाणघेवाण, कार्ड नसल्यावरचे व्यवहार आणि संपर्कहीन व्यवहार, ग्राहकांना आपल्या कार्डवर देण्यात येणाऱ्या सेवांसंबंधी निश्चित धोरण ठरवावं लागेल. या नव्या नियमांची अंमलबजावणी 16 मार्च, 2020 पासून होणार आहे. 'या' बँकेत खाते असल्यास दोन दिवसांत कामं उरका, 11 तास सुविधा राहणार बंद

पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त फायदा

16 मार्चपासून बदलणार SBI एटीएमच्या डेबिट अन् क्रेडिट कार्डचे नियम>> डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करताना ग्राहकांना घरगुती व्यवहारांची परवानगी दिली आहे. म्हणजेच एटीएम मशिनमधून पैसे काढणे आणि पीओएसद्वारे शॉपिंगसाठी परदेशी व्यवहारांना परवानगी देता येणार आहे. आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि संपर्कहीन व्यवहारासाठी ग्राहकांना आपली प्राथमिक माहिती द्यावी लागणार आहे. ग्राहकाला गरज असल्यास सुविधा मिळणार आहे.>> सद्यस्थितीतील व्यवहार आणि जोखमीच्या आधारावर ग्राहक निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच ग्राहकाला घरगुती व्यवहार करायचे आहेत की आंतरराष्ट्रीय याचा निर्णय ग्राहकच करणार असून, तसं बँकेला कळवावं लागणार आहे.>> ग्राहकांना 24/7 मध्ये व्यवहाराची मर्यादा कधीही बदलू शकतात. म्हणजेट एटीएम कार्डला मोबाइल ऍप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवर जाऊन किंवा आयव्हीआरद्वारे व्यवहाराची मर्यादा वाढवू शकतात. >> आरबीआयचे हे नियम प्रीपेड गिफ्ट कार्डवर लागू नाही. 

टॅग्स :एसबीआयबँकभारतीय रिझर्व्ह बँक