Join us

Patel Engineering Share Surges : महाराष्ट्र सरकारकडून 'या' कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठी ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, २ वर्षात १५०% रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:34 PM

Patel Engineering Share Surges : शेअर बाजारातील तेजीदरम्यान सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर आज फोकसमध्ये आहे. या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे.

Construction Stock: शेअर बाजारातील तेजीदरम्यान सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी पटेल इंजिनीअरिंगचा (Patel Engineering) शेअर आज फोकसमध्ये आहे. व्यवहारादरम्यान हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५७.२५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण मोठी ऑर्डर आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पटेल इंजिनीअरिंगच्या संयुक्त उपक्रमाला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे.

पटेल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या जॉईंट व्हेन्चरला जिगांव प्रकल्पाच्या क्षेत्रातून पहिल्या टप्प्यासाऑी वॉटर लिफ्टिंगच्या व्यवस्थेच्या निर्मितीशी निगडीत कामासाठी ३१७.६० कोटींची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली. संयुक्त उपक्रमात कंपनीचा हिस्सा ३५ टक्के आहे. या कंत्राटात पटेल इंजिनीअरिंगचा वाटा ११६.१६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करायचा आहे.

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या पटेल इंजिनीअरिंगची जलविद्युत, सिंचन, बोगदे आणि जलविद्युत आणि धरण प्रकल्पांच्या भूमिगत कामांमध्ये भक्कम उपस्थिती आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कंपनीचा रेकॉर्ड उत्तम आहे. कंपनीने ८५ हून अधिक धरणं, ४० जलविद्युत प्रकल्प आणि ३०० किलोमीटरपेक्षा जास्त बोगदे पूर्ण केले आहेत, ज्यात बहुतांश केंद्रीय सार्वजनिक उपक्रम किंवा राज्य सरकारच्या संस्था आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारपैसामहाराष्ट्र