Join us

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून मिळाली मोठी ऑर्डर; रॉकेट बनले 'या' छोट्या कंपनीचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 5:19 PM

एका दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 20% वाढ नोंदवली गेली.

Share Market :शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते, पण कधी-कधी अशा एखाद्या कंपनीचा शेअर हाती लागतो, जो दमदार परतावा देतो. अशाच कंपन्यांमध्ये JNK India कंपनीचे शेअर्सदेखील आहेत. जेएनके इंडियाचा शेअर मंगळवारी 20% वाढून 814.50 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता. विशेष म्हणजे, JNK इंडियाच्या शेअर्समधील या वाढीचे कारण एक मोठी ऑर्डर आहे. 

JNK इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कडून मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्स 350-500 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. जेएनके इंडियाने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले की, 'आम्हाला 14 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून एक मेगा ऑर्डर मिळाली झाली आहे. ही ऑर्डर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग विभागातील गॅस क्रॅकर युनिट (GCU) डी-बॉटलनेकिंग (DBN) प्रकल्पासाठी आहे.

कंपनीचा IPO 2 महिन्यांपूर्वी आलेला दरम्यान, JNK इंडियाचा IPO 23 एप्रिल 2024 रोजी उघडण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 415 रुपये होती. गेल्या 5 दिवसात JNK इंडियाचे शेअर्स 28% पेक्षा जास्त वाढले आहेत. गेल्या 5 दिवसांत कंपनीचे शेअर्स 634 रुपयांवरून 814.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जेएनके इंडियाची सुरुवात 2010 मध्ये झाली. कंपनी इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (EPC) सेवा देते. 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररिलायन्स