Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio चं मोठं प्लॅनिंग! लवकर येऊ शकते 'हे' डिव्हाईस, मोफत मिळणार चॅनल्स; साध्या टीव्हीवरही करेल काम

Jio चं मोठं प्लॅनिंग! लवकर येऊ शकते 'हे' डिव्हाईस, मोफत मिळणार चॅनल्स; साध्या टीव्हीवरही करेल काम

जिओ सध्या देशातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी लवकरच एक असे उपकरण आणणार आहे ज्याद्वारे तुम्ही मोफत टीव्ही चॅनेल पाहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 01:41 PM2023-02-10T13:41:34+5:302023-02-10T13:44:41+5:30

जिओ सध्या देशातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी लवकरच एक असे उपकरण आणणार आहे ज्याद्वारे तुम्ही मोफत टीव्ही चॅनेल पाहू शकता.

Big planning of Jio Coming soon the device will get free channels jio cables Will also work on a simple TV | Jio चं मोठं प्लॅनिंग! लवकर येऊ शकते 'हे' डिव्हाईस, मोफत मिळणार चॅनल्स; साध्या टीव्हीवरही करेल काम

Jio चं मोठं प्लॅनिंग! लवकर येऊ शकते 'हे' डिव्हाईस, मोफत मिळणार चॅनल्स; साध्या टीव्हीवरही करेल काम

जिओ सध्या देशातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी लवकरच एक असे उपकरण आणणार आहे ज्याद्वारे तुम्ही मोफत टीव्ही चॅनेल पाहू शकता. याशिवाय तुम्ही मोठ्या स्क्रीनवर आयपीएलचा मोफत आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला Jio Media Cable बद्दल बोलत आहोत.

Jio Media Cable च्या मदतीने कंपनी अनेक DTH ऑपरेटर्सशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. जिओ मीडिया केबल हे एक लहान डिव्हाइस आहे जे तुम्हाला तुमच्या टीव्हीमध्ये इंस्टॉल करावे लागेल. हे उपकरण जुन्या टीव्ही किंवा नवीन टीव्ही दोन्हीमध्ये वापरता येऊ शकते. याबाबतची माहिती सर्वप्रथम GyanTherapy नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली. यामध्ये या स्ट्रीमिंग डिव्हाईस कशी काम करेल याबाबत माहिती देण्यात आली. अमेझॉन फायर आणि गुगल क्रोम सारखी स्ट्रीमिंग उपकरणे आधी बाजारात आहेत, पण यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

जिओच्या या डिव्हाइसवरून आयपीएल व्यतिरिक्त टीव्हीवर फिल्म्स आणि वेबसीरिजही पाहता येतील. वर नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही ते कोणत्याही नॉन-स्मार्ट किंवा स्मार्ट टीव्हीमध्ये याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एक केबल मिळेल. जिओ मीडिया केबलच्या कामाची पद्धतही व्हिडीओमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

कसं करेल काम?
जिओ मीडिया केबलमध्ये दोन पार्ट्स देण्यात आले आहेत. त्याचा एक भाग HDMI केबलच्या मदतीने टीव्हीला जोडावा लागेल. तर केबलच्या मदतीने दुसरा भाग JioPhone किंवा डिव्हाइसशी कनेक्ट करावा लागेल. यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन USB Tethering पर्याय सक्षम करावा लागेल.
 
हा ऑप्शन अनेबल झाल्यानंतर तुम्ही जिओ सिनेमाच्या मदतीनं टीव्हीवर कंटन्ट पाहू शकता. तुम्ही हाय क्वालिटीमध्येही याचा आनंद घेऊ शकता. याच्या किंमतीतबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु हे डिव्हाईस २ हजार रुपयांच्या आत लाँच केले जाऊ शकते.

Web Title: Big planning of Jio Coming soon the device will get free channels jio cables Will also work on a simple TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.