देशात कोरोना महामारीमुळे हेल्थ इन्शुरन्सची मोठी मागणी वाढली आहे. अनेकांना या इन्शुरन्सचे महत्व कळाले आहे. मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, आपल्या देशात एलआयसी या विमा कंपनीच्या पोलिसींना मोठी मागणी असते. पण, एलआयसी अजुनही 'हेल्थ इन्शुरन्स' योजना सुरू केली नव्हती. पण, आता एलआयसी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आता एलआयसी 'हेल्थ इन्शरन्स'क्षेत्रात पाऊलं टाकणार आहे.
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी LIC आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी, सरकार चालवणारी विमा कंपनी या क्षेत्रात आधीच कार्यरत असलेली कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. संयुक्त विमा कंपन्यांना मान्यता देण्याच्या प्रस्तावादरम्यान, भारतीय आयुर्विमा महामंडळानेही आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.
याबाबत एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी अपडेट दिली आहे. "आम्हाला आशा आहे की कंपोजिट लायसन्स मंजूर होऊ शकेल आणि आम्ही काम करत आहोत. आम्ही आरोग्य क्षेत्रात आमची स्वारस्य वाढवत आहोत आणि विविध वाढीच्या संधींचा विचार करत आहोत, असंही सिद्धार्थ मोहंती म्हणाले. संसदीय पॅनेलने खर्च आणि अनुपालनाचा भार कमी करण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपोजिट लायसन्स सुरू करण्याचे सुचवले आहे.
जीवन विमा कंपन्या फक्त आरोग्य विम्यांतर्गत दीर्घकालीन लाभ देऊ शकतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कायद्यात सुधारणा करावी लागेल. त्यासाठी संसदेच्या समितीने विमा कंपन्यांचा खर्च आणि अनुपालनाचा भार कमी करण्यासाठी कंपोजिट इन्शुरन्स लायसेन्स सुरू करण्याची सूचना केली होती.
२०२२-२३ च्या शेवटी २.३ कोटींपेक्षा कमी आरोग्य विमा कवच दिले होते, यामध्ये ५५ कोटी लोकांना कव्हर केले जाते. 'अधिक आरोग्य कवच जारी केले जावे आणि आरोग्य विमा क्षेत्रात एलआयसीच्या प्रवेशामुळे याला वेग येईल, असा सरकार आणि विमा नियामक IRDAI चा विश्वास आहे.