Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंपर कमाईची गॅरंटी असलेला 'हा' व्यवसाय; कमी खर्चात मिळेल मोठा नफा!

बंपर कमाईची गॅरंटी असलेला 'हा' व्यवसाय; कमी खर्चात मिळेल मोठा नफा!

Business Idea : या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा सीजन कधीही संपत नाही. या वेफर्सना बाजारात मोठी मागणी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:51 PM2022-08-10T13:51:50+5:302022-08-10T13:52:33+5:30

Business Idea : या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा सीजन कधीही संपत नाही. या वेफर्सना बाजारात मोठी मागणी आहे.

big profits in the business of wafers earn lakhs of rupees by investing less amount | बंपर कमाईची गॅरंटी असलेला 'हा' व्यवसाय; कमी खर्चात मिळेल मोठा नफा!

बंपर कमाईची गॅरंटी असलेला 'हा' व्यवसाय; कमी खर्चात मिळेल मोठा नफा!

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसाय फळे आणि भाज्यांच्या वेफर्सचा आहे. म्हणजेच बटाटा, केळी, गाजर, बीट, पपई, रताळे चिप्स बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला मोठी कमाई करून देऊ शकतो. हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये मंदीची शक्यता खूपच कमी आहे. 

या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा सीजन कधीही संपत नाही. या वेफर्सना बाजारात मोठी मागणी आहे. यातील आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, या व्यवसायात तुम्हाला जास्त स्पर्धेला सामोरे जावे लागणार नाही, कारण आतापर्यंत मोठ्या कंपन्या या क्षेत्रात आलेल्या नाहीत. या व्यवसायात कठोर परिश्रम करून आणि चांगली रणनीती वापरून, तुम्ही लवकरच त्यात प्रगती करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कच्चा माल लागेल. तुम्ही कोणतेही फळ किंवा भाजीपाला वेफर्स बनवत असाल तर तुम्हाला त्यासोबत मसाले, मीठ आणि खाद्यतेल लागेल. वेफर्स बनवण्यासाठी मशीन लागेल. तसेच, फळे आणि भाज्या सोलणे, उकळणे आणि पातळ काप करण्यासाठी मशीनची देखील आवश्यकता असेल. तुम्हाला पाऊच प्रिंट करण्यासाठी एक मशीन देखील घ्यावी लागेल. जर तुम्हाला ते विकत घ्यायचे नसेल तर तुम्ही ते भाड्यानेही घेऊ शकता किंवा बाहेर प्रिंट करून घेऊ शकता.

जवळपास 5,000 ते 7,000 रुपये खर्च 
या व्यवसायात 100 किलो उत्पादन तयार करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल, मसाले आणि खाद्यतेल आणि इतर खर्चासह जवळपास 5,000 ते 7,000 रुपये खर्च करावे लागतील. कधी कधी भाज्या आणि फळांच्या किमती वाढतात, मग तुमचे बजेट थोडे जास्त वाढू शकते. बाजारात वेफर्सची किंमत 150 रुपये किलो आहे. म्हणजेच 100 किलोसाठी तुम्हाला 15,000 रुपये मिळतील. जेव्हा तुम्ही या भांडवलामधून 7000 रुपये खर्च काढला, तर तुमच्याकडे 8000 रुपये शिल्लक राहतील.

70-100 रुपये प्रति किलोपर्यंत नफा
समजा तुम्ही रोज 40 ते 60 किलो वेफर्स बनवले तर. त्यातून सर्व खर्च काढून तुम्हाला 70-100 रुपये प्रति किलोपर्यंत नफा मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज 2800 रुपयांपासून ते 6,000 रुपयांपर्यंत सहज कमवू शकता. अशा प्रकारे तुम्ही दरमहा लाखो रुपयांची कमाई होऊ शकेल. आजकाल मुंबईत अनेक लोक या वेफर्सचा व्यवसाय करत आहेत आणि त्यांची उत्पादने देश-विदेशात पुरवून लाखो रुपये कमवत आहेत.

Web Title: big profits in the business of wafers earn lakhs of rupees by investing less amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.