Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ!

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ!

महागाईच्या आघाडीवर सरकार आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली दिसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:22 PM2023-01-12T18:22:20+5:302023-01-12T18:23:35+5:30

महागाईच्या आघाडीवर सरकार आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली दिसला आहे.

big relief on inflation remained below 6 percent for the 2nd consecutive month | सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ!

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ!

महागाईच्या आघाडीवर सरकार आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली दिसला आहे. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा महागाई ६ टक्क्यांच्या खाली गेली आहे आणि नोव्हेंबरच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई दर ५.७२ टक्के दिसला आहे, तर नोव्हेंबर महिन्यात हा आकडा ५.८८ टक्के होता. आता देशातील किरकोळ महागाई वर्षभरातील नीचांकी पातळीवर आला आहे.

विशेषत: भाज्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात मोठं यश आलं आहे. महागाईच्या बकेटच्या जवळपास ४० टक्के वाटा असलेला अन्नधान्य महागाई डिसेंबरमध्ये ४.१९ टक्‍क्‍यांवर आली, जी मागील महिन्यात ४.६७ टक्‍क्‍यांवर होती. दुसरीकडे, सरकारी आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) नोव्हेंबरमध्ये ७.१ टक्क्यांनी वाढला आहे, जो ऑक्टोबरमध्ये ४ टक्क्यांवर होता.

अमेरिकेतही महागाई कमी होऊ शकते
डिसेंबरमध्ये यूएस कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) देखील मऊ होण्याची अपेक्षा आहे. डेटा प्रदाता FactSet च्या सर्वेक्षणानुसार, विश्लेषकांनी अंदाज वर्तवला आहे की डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ६.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये तो ७.१ टक्के आणि जूनमध्ये ९.१ टक्क्यांच्या खाली असेल.

सोमवारी, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आता पुढील वर्षी ५ टक्के महागाईची अपेक्षा आहे. सुमारे १८ महिन्यांतील ही सर्वात कमी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये, ग्राहकांना महागाई सरासरी २.४ टक्के अपेक्षित आहे, जे फेडच्या २ टक्के उद्दिष्टापेक्षा अगदीच जास्त आहे.

Web Title: big relief on inflation remained below 6 percent for the 2nd consecutive month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.