Join us

एलआयसीला मोठा दिलासा; नियम पूर्ततेसाठी जादा वेळ, समभागही उसळले, १ हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 8:45 AM

या घोषणेनंतर एलआयसीचे समभाग बुधवारी जोरदार उसळून ९९९ रुपयांवर पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळास (एलआयसी) १० टक्के ‘सार्वजनिक समभाग धारकते’च्या (पब्लिक शेअरहोल्डिंग) नियमाची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त ३ वर्षांची मुदत बाजार नियामक सेबीने दिली. या घोषणेनंतर एलआयसीचे समभाग बुधवारी जोरदार उसळून ९९९ रुपयांवर पोहोचले.

सेबीने नियम १९ (ब) अनुसार १० टक्के सार्वजनिक समभाग धारकतेसाठी ३ वर्षांची मुदतवाढ १४ मे रोजी दिली. याच्या पूर्तीसाठी आता एलआयसीला १६ मे २०२७ पर्यंतची मुदत मिळाली. या निर्णयाची माहिती बाजारात येताच एलआयसीच्या समभागांत सुमारे ७ टक्के तेजी आली. 

सेबीचा नियम काय? 

कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतर आधी १० टक्के व नंतर एकूण २५ टक्के समभाग लोकांसाठी खुले करणे आवश्यक आहे. २५ टक्के समभाग लोकांसाठी खुले करण्याची मुदत ५ वर्षे आहे. त्यासाठी एलआयसीला सरकारने सवलत देऊन १० वर्षांची म्हणजेच २०३२ पर्यंतची मुदत दिली. १० टक्के समभाग खुले करण्याची मुदत मात्र संपत आली होती. तिला आता सेबीने मुदतवाढ दिली आहे.

 

टॅग्स :एलआयसीएलआयसी आयपीओशेअर बाजारशेअर बाजार