यूपीए सरकार हे भ्रष्ट सरकार होते, त्याने देशात 'जयंती टॅक्स'ला जन्म दिला. एवढेच नाही, तर यूपीए सरकारमध्ये सोनिया गांधी या 'सुपर प्राईम मिनिस्टर' होत्या. त्यांच्या नेतृत्वाखालील NAC ही 'किचन कॅबिनेट'पेक्षाही वाईट होती, अशा शब्दात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. त्या 'भारतीय अर्थव्यवस्था आणि देशातील नागरिकांवर तिचा परिणाम यावरील श्वेतपत्रिका' यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
दर वर्षी मोठा घोटाळा समोर आला -आर्थिक गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि घोटाळे यासंदर्भात बोलताना सीतारामन म्हणाल्या, त्यावेळी नेतृत्वाची कमी होती. ‘श्वेतपत्रिका’ एक गंभीर दस्तएवज आहे. श्वेतपत्रिकेतील प्रत्येक माहिती सप्रमाण आहे. '2015-16 मध्ये पीएम मोदी म्हणाले होते की, इकोनॉमीच्या परिस्थितीसंदर्भात श्वेतपत्रिका आणावी, अशा सूचना येत आहेत. पण मी ते राष्ट्रहितासाठी आणत नाही.' तेव्हा ‘श्वेतपत्रिका’ आणली असती तर गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगू शकला असतात. त्या म्हणाल्या, यूपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले. परिस्थिती तर असी होती की, दर वर्षी मोठा घोटाळा समोर येत होता.
गेल्या 10 वर्षांत बजेट दुप्पट -अर्थमंत्री म्हणाल्या, 'अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी 10 वर्षांपर्यंत प्रयत्न केल्यानंतर, आज आपण ‘फ्रेजाइल 5’ वरून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. यूपीए सरकारमध्ये लष्कर दारूगोळा आणि इतर लष्करी साहित्याच्या कमतरतेचा सामना करत होते. यूपीए सरकारच्या काळात डिफेन्स प्रोजेक्टमध्ये घोटाळे होत होते. गेल्या 10 वर्षांत, बजेट दुप्पट वाढले आहे.' एवढेच नाही, तर सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यात आली आहे. या सरकारने एचएएलला 4 लाख कोटी रुपयांचे ऑर्डर दिले आहेत. देशातून 16000 कोटी रुपयांची निर्यात होत आहे.