Lokmat Money > बिझनेस न्यूज > ACतून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, लवकरच रेल्वे विशेष शुल्क आकारणार

ACतून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, लवकरच रेल्वे विशेष शुल्क आकारणार

एसी 2 आणि एसी 3मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी यूजर फी कमी असेल, तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी तो माफक असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 05:30 PM2020-09-28T17:30:04+5:302020-09-28T17:34:21+5:30

एसी 2 आणि एसी 3मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी यूजर फी कमी असेल, तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी तो माफक असेल.

big shock to train passengers traveling through AC, trains will soon charge special fees | ACतून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, लवकरच रेल्वे विशेष शुल्क आकारणार

ACतून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, लवकरच रेल्वे विशेष शुल्क आकारणार

आता आपला ट्रेनमधील प्रवासही महागणार आहे. रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर प्रवाशांकडून फी वसूल करण्याची तयारी करीत आहे. ही म्हणजे ट्रेनच्या तिकिटांचा हा एक भाग असेल. एसी कोच प्रवाशांना प्रवास करताना जास्त पैसे भरावे लागणार आहेत. एसी 1मध्ये प्रवास करणा-यांना युजर फी म्हणून 30 रुपये द्यावे लागतील. एसी 2 आणि एसी 3मध्ये प्रवास करणार्‍यांसाठी यूजर फी कमी असेल, तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी तो माफक असेल.

टीओआयच्या अहवालानुसार, किमान यूजर फी 10 रुपये असेल. रेल्वे मंत्रालय यासंदर्भातील प्रस्तावावर काम करीत आहे, जो लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळात ठेवला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरक्षित नसलेल्या प्रवर्गातून आणि उपनगरी रेल्वे प्रवाशांकडून किमान यूजर फी गोळा करावी की त्यापासून मुक्त राहावे यावर चर्चा आहे. रेल्वे मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी केलेल्या प्रस्तावानुसार प्रवाशाला यूजर फी द्यावी लागेल. तसेच जर तुम्ही रेल्वे स्थानकात एखाद्यास सोडण्यासाठी गेला असाल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या तिकिटाव्यतिरिक्त अभ्यागत फी देखील भरावी लागेल.

बर्‍याच कंपन्यांना युजर फीचा फायदा होईल
रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी नुकतेच सांगितले की, यूजर फीमुळे सामान्य प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही. पुढील महिन्यात यूजर फीबाबत अधिसूचना जारी केली जाऊ शकते. नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख रेल्वेने 6 नोव्हेंबरपर्यंत निश्चित केली आहे. यूजर फी ही बर्‍याच कंपन्यांच्या महसुलाची हमी देण्याचा एक मार्ग असेल.

स्थानकांच्या पुनर्विकासासाठी यूजर फी आकारण्याची योजना
रोकड संकटाला सामोरे जाणा-या रेल्वेने पीपीपी मोडवरील 50 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी प्रवाशांवर फी आकारण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावानुसार, प्रवाशांकडून ट्रेनमधून उतरताना यूजर फीच्या स्वरूपात 50 टक्के इतकी रक्कम गोळा केली जाईल. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मची तिकिटे खरेदी करणा-यांसाठी दहा रुपये फीस आकारली जाईल.

Web Title: big shock to train passengers traveling through AC, trains will soon charge special fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.