Lokmat Money > बिझनेस न्यूज > DBT Scheme: अबब! डीबीटी योजनेचे मोठे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले

DBT Scheme: अबब! डीबीटी योजनेचे मोठे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले

2014 पासून सुरू झालेल्या डीबीटी योजनेत गेल्या अडीच वर्षांत 56 टक्के रक्कम वळती करण्यात आली आहे. संकटाच्या वेळी लोकांना मदत पोहोचविण्याचे महत्वाचे साधन ही योजना बनली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:27 PM2022-09-18T18:27:24+5:302022-09-18T18:29:02+5:30

2014 पासून सुरू झालेल्या डीबीटी योजनेत गेल्या अडीच वर्षांत 56 टक्के रक्कम वळती करण्यात आली आहे. संकटाच्या वेळी लोकांना मदत पोहोचविण्याचे महत्वाचे साधन ही योजना बनली आहे.

Big success of DBT scheme, so far Modi government has put 25 trillion rupees in the account of the poor | DBT Scheme: अबब! डीबीटी योजनेचे मोठे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले

DBT Scheme: अबब! डीबीटी योजनेचे मोठे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले

नरेंद्र मोदींच्या सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमद्वारे गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकल्याचा मोठा विक्रम केला आहे. या योजनेद्वारे आज 25 ट्रिलियन रुपयांचा आकडा पार केला आहे. 
या योजनेत दरवर्षी नवे नवे लाभार्थी जोडले जात आहेत. यामुळे हा आकडा वाढत चालला आहे. 2019-20 मध्ये DBT योजनेअंतर्गत 3 ट्रिलियन रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्याच वेळी, 2021-21 मध्ये, हे प्रमाण 5.5 ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढले. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम 6.3 ट्रिलियन रुपये एवढी होती. गेल्या सहा महिन्यांत गरीबांच्या खात्यात 2.35 ट्रिलियन रुपये जमा करण्यात आले आहेत. 

2014 पासून सुरू झालेल्या डीबीटी योजनेत गेल्या अडीच वर्षांत 56 टक्के रक्कम वळती करण्यात आली आहे. आपत्तीच्या वेळी लोकांना मदत पोहोचविण्याचे महत्वाचे साधन ही योजना बनली आहे. मार्च 2020 च्या कोरोना काळात या योजनेचा मोठा वापर झाला आहे. डीबीटी हा कोरोना काळात लोकांची तारणहार बनली होती. बँक खात्यात थेट सरकारचे पैसे जात होते. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 73 कोटी लोकांनी रोखीने DBT योजनेचा लाभ घेतला, तर 105 कोटी लोकांनी DBT चा लाभ इतर माध्यमातून घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

डीबीटी योजनेमुळे 2.2 ट्रिलियन रुपये चुकीच्या हातात पडण्यापासून वाचल्याचा दावाही सरकार करत आहे. 53 केंद्रीय मंत्रालयांच्या 319 योजना DBT योजनेशी जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये एलपीजी पायल योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था, खत आणि खत योजना, पीएम आवास योजना, अनेक शिष्यवृत्ती योजना आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य यांसारख्या योजनांचा समावेश आहे. न्यूज १८ ने ही माहिती दिली आहे. 

DBT योजना यूपीए सरकारने 2013-14 मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली होती. नरेंद्र मोदी सरकारने 2014-15 मध्ये या योजनेचा विस्तार केला. 2019-20 पर्यंत त्यात आणखी अनेक योजना जोडल्या गेल्या. लाभार्थ्यांच्या हातात थेट पैसे जाऊ लागल्याने मधल्या मध्येच पैसे गडप होण्याचे प्रकार कमी झाले आहेत. 

Web Title: Big success of DBT scheme, so far Modi government has put 25 trillion rupees in the account of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.