Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार

PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार

सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:51 PM2023-10-23T15:51:49+5:302023-10-23T15:54:51+5:30

सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.

Big update ahead of PM Kisan's 15th installment income tax payers and govt employees have to return pm kisan money | PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार

PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार

देशातील कोट्यवधी लाभार्थी पीएम किसान सन्मान निधीच्या 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र याच बरोबर सरकारने नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत, एका शेतकऱ्याला वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात.

सुरू आहे वसूली अभ‍ियान -
सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात. सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2023 पासून वसूलीसाठी अभ‍ियान सुरू आहे. याशिवाय अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पंचायत पातळीवर ई-केवायसीदेखील करण्यात येत आहे.

आपले ई-केवायसी असणे आवश्यक - 
पीएम क‍िसान न‍िध‍ीअंतर्कगत 27 जुलै रोजी खातेदारांना 14व्या हप्ता देण्यात आला होता. आपल्याला 15वा हप्ता घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आपले ई-केवाईसी असणे आवश्यक आहे.
 

Web Title: Big update ahead of PM Kisan's 15th installment income tax payers and govt employees have to return pm kisan money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.