नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांच्या सुविधेसाठी एक मोठी अपडेट दिली आहे. ज्या सदस्यांना त्यांचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वाची ठरू शकते. आता यासाठी सदस्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ते घरी बसून त्यांचे पीएफचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर (Online Money Transfer)करू शकतात.
ईपीएफओने बुधवारी सकाळी 11:26 वाजता आपल्या सदस्यांसाठी अपडेट जारी केले आहे. तसेच, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये काही सोपे मार्ग सांगितले आहेत, ज्याच्या मदतीने ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतात.
हे डिटेल्स सुद्धा महत्त्वाचे
जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे देखील ट्रान्सफर करायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्हेट करावा लागेल. याशिवाय खातेदाराकडे बँक खाते, आधार कार्ड क्रमांक आणि इतर सर्व आवश्यक डिटेल्सची माहिती असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन ट्रान्सफरसाठी या सोप्या स्टेप्स
- युनिफाइड मेंबर पोर्टलला (Unified Member Portal) भेट देऊन UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- ऑनलाइन सर्व्हिसवर (Online Services) क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Online Member-One EPF Account (Transfer Request) वर जावे लागेल.
- यानंतर, सध्याच्या कंपनीशी संबंधित Personal Information आणि PF Account चा व्हेरिफाय करावे लागेल.
- Get Details ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला मागील कंपनीचे पीएफ खाते तपशील दिसेल.
- फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी मागील किंवा वर्तमान कंपनी निवडा.
- UAN रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP मिळवण्यासाठी Get OTP वर क्लिक करा. यानंतर, ओटीपी टाकल्यानंतर Submit वर क्लिक करा.
तीन दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल
ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर प्रक्रियेची विनंती पाठविली जाईल. यानंतर, पैसे ट्रान्सफर प्रक्रियेस तीन दिवस लागतात. या दरम्यान, हे पैसे तुम्हाला पाहिजे असलेल्या खात्यात ट्रान्सफर होतील. यादरम्यान, कंपनी तुमच्या सांगितलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल, ज्याची ईपीएफओच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केली जाईल. यानंतर पैसे तुमच्या सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.