Lokmat Money > बिझनेस न्यूज > Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन

Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन

वाचा ईपीएफओनं घेतला कोणता निर्णय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:03 PM2024-01-04T13:03:07+5:302024-01-04T13:03:27+5:30

वाचा ईपीएफओनं घेतला कोणता निर्णय.

Big update of EPFO regarding Pension Scheme higher pension scheme important deadline extended for five months | Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन

Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन

EPFO Higher Pension Scheme: एम्प्लॉईज पेन्शन स्कीम (EPS) अंतर्गत, सेवानिवृत्तीच्या वेळी ईपीएफओ​​कडून अधिक पेन्शन मिळविण्यासाठी एक हायर पेन्शन स्कीम सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ होती. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं बुधवारी ही मुदत आता पाच महिन्यांनी वाढवण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. योजनेसाठी अर्ज करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी एम्प्लॉयर्सना ३१ मे २०२४ पर्यंत वेळ आहे.

यापूर्वी वाढवलेली अंतिम मुदत
४ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, हायर पेन्शन स्कीम २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू करण्यात आली, जी पूर्वी केवळ ३ मे २०२३ पर्यंत होती. दरम्यान, पेन्शनधारक आणि सदस्यांची मागणी लक्षात घेऊन, त्याची अंतिम मुदत २६ जून २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. नंतर ती आणखी १५ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. आतापर्यंत, EPFO ​​ला निवृत्तीवेतनधारक आणि सदस्यांकडून एकूण १७.५९ लाख अर्ज मिळाले होते.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत
एम्पलॉयर आणि एम्पलॉयर संघटनांच्या वतीनं, ईपीएफओ​​ला त्यांना पेन्शनधारक आणि सदस्यांचे वेतन तपशील अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती करण्यात आली होती. म्हणून, ती मुदत प्रथम ३० सप्टेंबर २०२३ आणि नंतर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.

एम्पलॉयरकडे अद्याप ३.६ लाखांहून अधिक अर्ज प्रोसेस होण्यासाठी शिल्लक आहेत. हे पाहता, वेतन तपशील ऑनलाइन अपलोड करण्यासाठी ईपीएफओ​नं ३१ मे २०२४ पर्यंत अतिरिक्त वेळ दिला आहे.

Web Title: Big update of EPFO regarding Pension Scheme higher pension scheme important deadline extended for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.