शार्क टँक इंडिया हा स्टार्टअप्ससाठी अतिशय खास कार्यक्रम आहे. सोनी लिव्हवर येत असलेल्या या कार्यक्रमात अनेक स्टार्टअप्स येतात आणि काही जजेससमोर आपलं पिच सादर करतात. यानंतर जजेसना ते स्टार्टअप योग्य वाटल्यास त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. शार्क टँक इंडियाचे दोन सीझन आले आहेत आणि लोक तिसर्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India Season 3) तिसऱ्या सीझनची वाट पाहणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही असाल, तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Sony Liv ने स्वतः शार्क टँक इंडिया बाबत एक मोठं अपडेट दिलंय. या सीझनमध्ये कोण जज असतील हेही सोनी लिव्हनं सांगितलंय.
Shark Tank India Season 3 बाबत मोठी अपडेट आली समोर; केव्हा सुरू होऊ शकतं आणि कोण असणार जज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 2:06 PM