Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा मोटर्सचा मोठा विजय, सिंगूर प्रकरणात बंगाल सरकारला द्यावे लागणार ७६६ कोटी, लवादाचा निर्णय

टाटा मोटर्सचा मोठा विजय, सिंगूर प्रकरणात बंगाल सरकारला द्यावे लागणार ७६६ कोटी, लवादाचा निर्णय

Tata Motors: देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सला सिंगूर प्रकरणात मोठा विजय मिळाला आहे. सिंगूरमधील टाटा मोटर्सची नॅनो फॅक्टरी बंद केल्याबद्दल कंपनीला सप्टेंबर २०१६ पासून ११ टक्के व्याजासोबत ७६६ कोटी रुपये देण्याचे आदेश लवादाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:46 PM2023-10-30T20:46:36+5:302023-10-30T20:47:00+5:30

Tata Motors: देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सला सिंगूर प्रकरणात मोठा विजय मिळाला आहे. सिंगूरमधील टाटा मोटर्सची नॅनो फॅक्टरी बंद केल्याबद्दल कंपनीला सप्टेंबर २०१६ पासून ११ टक्के व्याजासोबत ७६६ कोटी रुपये देण्याचे आदेश लवादाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

Big win for Tata Motors, Bengal government will have to pay 766 crores in Singur case, arbitrator's decision | टाटा मोटर्सचा मोठा विजय, सिंगूर प्रकरणात बंगाल सरकारला द्यावे लागणार ७६६ कोटी, लवादाचा निर्णय

टाटा मोटर्सचा मोठा विजय, सिंगूर प्रकरणात बंगाल सरकारला द्यावे लागणार ७६६ कोटी, लवादाचा निर्णय

देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सला सिंगूर प्रकरणात मोठा विजय मिळाला आहे. सिंगूरमधील टाटा मोटर्सची नॅनो फॅक्टरी बंद केल्याबद्दल कंपनीला सप्टेंबर २०१६ पासून ११ टक्के व्याजासोबत ७६६ कोटी रुपये देण्याचे आदेश लवादाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. टाटा मोटर्सने याबाबतची माहिती आज दिली आहे. तीन सदस्यीय लवादाने कंपनीच्या बाजूने एकमताने निर्णय दिल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीने एका पत्रकामधून नॅशनल स्टॉक एक्सेंजला सांगितले की, सिंगूरमध्ये  ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लँटबाबत ही माहिती देण्यात येते की, तीन सदस्यीय लवादासमोर वरील सुनावणीमध्ये आता ३० ऑक्टोबर २०२३ रोजी निर्णय एकमताने टाटा मोटर्स लिमिटेच्या बाजूने लावण्यात आला. टाटा मोटर्सला प्रतिवादी असलेल्या पश्चिम बंगाल औद्योगिक विकास निगमककडून १ सप्टेंबक २०१६ ते वास्तविक वसुलीपर्यंत ११ टक्के वार्षिक व्याजासह ७६५.७८ कोटी रुपये रक्कम वसूल करण्याचा हक्क असल्याचे दिसून आले आहे. 

सिंगूर येथील वादामुळे टाटा मोटर्सला सिंगूरमधील प्रोजेक्ट बंद करावा लागला होता. त्यानंतर ही कंपनी गुजरातमध्ये निघून गेली होती. तसेच टाटा नॅनोच्या उत्पादनासाठी साणंद येथे प्लँट तयार करण्यात आला होता.  

Web Title: Big win for Tata Motors, Bengal government will have to pay 766 crores in Singur case, arbitrator's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.