Join us

बिगबुल झुनझुनवाला यांच्या Akasa Air ला ६०२ कोटींचा तोटा, कंपनी १०० विमानं ऑर्डर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 4:36 PM

बिगबुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला हे अकासा एअरलाइन्सचे संस्थापक होते.

अकासा एअर (Akasa Air) या विमान वाहतूक क्षेत्रात दाखल झालेल्या नवीन विमान कंपनीनं 602 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा (operating Loss) नोंदवला आहे. बिगबुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला हे अकासा एअरलाइन्सचे संस्थापक होते. दरम्यान, कंपनी या वर्षाच्या अखेरीस १०० हून अधिक विमानांची ऑर्डर देणार असल्याची माहिती अकासा एअरच्या सीईओंनी दिली. एअरलाइन्स आपल्या ताफ्यातील विमानांची संख्या वाढवणार आहे.

लोकसभेत नागरी उड्डाण राज्यमंत्री व्हीके सिंह यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, आकासा एअरलाइननं ६०२ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग तोटा नोंदवला आहे, तर ७७७.८ कोटी रुपयांची कमाई केली. विमान कंपनीचा परिचालन खर्च १,८६६ कोटी रुपये होता. एअरलाइननं गेल्या ऑगस्टमध्ये ऑपरेशन सुरू केले आणि ही आकडेवारी ३१ मार्च २०२३ पर्यंतची आहे.

आकासा एअरलाइनचा खर्च प्रामुख्यानं प्री-ऑपरेटिंग कॉस्ट आणि स्टेशन्स तसंच नवीन मार्ग उभारण्यासाठीचा खर्च आल्याचं सूत्रांनी सांगितले. जेव्हा तुम्ही एका निश्चित ठिकाणी आणि स्केलवर पोहोचता तेव्हाच रुटच्या विकासावर होणाऱ्या खर्चातून पौसा फिरू लागतो, असं अकासाच्या योजनांची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं. विमान कंपनीनं आक्रमकपणं विस्तार करून आणि नवीन मार्ग सुरू करून चांगली कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.

इंडिगोलाही झालेला तोटाआकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइननं २००६-०७ च्या पहिल्या वर्षात १७४.१ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता आणि त्यांच्याकडे फक्त सहा विमानं होती. ऑपरेशनच्या तिसऱ्या वर्षात इंडिगोला ८२ कोटी रुपयांचा नफा झाला. त्याचप्रमाणे आकासा एअरही नफ्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालालोकसभा