Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ

स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ

शेअर बाजारातील महत्वाच्या निर्देशांकांचा विचार केल्यास सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये सर्वांमध्येच वाढ

By admin | Published: April 3, 2017 04:35 AM2017-04-03T04:35:04+5:302017-04-03T04:35:04+5:30

शेअर बाजारातील महत्वाच्या निर्देशांकांचा विचार केल्यास सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये सर्वांमध्येच वाढ

The biggest increase in the smallcap index | स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ

स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ

मुंबई शेअर बाजारातील महत्वाच्या निर्देशांकांचा विचार केल्यास सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये सर्वांमध्येच वाढ झालेली दिसून येत आहे. असे असले तरी स्मॉलकॅप निर्देशांकाने नोंदविलेली वाढ ही सर्वाधिक असून या दुर्लक्षित निर्देशांकाला आगामी काळात बरेच महत्व येणार असल्याची ही चिन्हे मानावी लागतील.
वर्षभरामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने
४२७८.६४ अंश म्हणजेच १६.८८ टक्के तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १४३५.३५ अंश म्हणजेच १८.५४ टक्के वाढ नोंदविली आहे.
बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांनी वाढीच्या बाबतीत प्रस्थापित निर्देशांकांवर मात केली आहे. वर्षभरामध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे ३४७७.७० अंश (३२.७४ टक्के ) आणि ३८९२.१८ अंश (३६.९२ टक्के) अशी वाढ दिली आहे. गेल्या सात वर्षांमधील त्यांच्या कामगिरीतील ही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी ठरली आहे. यावरून बाजाराचे लक्ष आता या क्षेत्रीय निर्देशांकांकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

Web Title: The biggest increase in the smallcap index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.