नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील जोरदार खरेदी या बळावर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पाच महिन्यांतील सर्वांत मोठी उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही मोठी झेप घेतली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २८,0५0,८८ अंकांवर बंद झाला. ५२0.९१ अंकांची अथवा १.८९ टक्क्यांची घसघशीत वाढ त्याने मिळविली. २५ मेनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय वाढ ठरली. २५ मे रोजी सेन्सेक्स ५७५.७0 अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी १५७.५0 अंकांनी अथवा १.८५ टक्क्यांनी वाढून ८,६७७.९0 अंकांवर बंद झाला. निफ्टीचीही ही पाच महिन्यांतील सर्वांत मोठी उसळी ठरली.
बँकिंगचे समभाग प्रकाशझोतात राहिले. आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यांचे समभाग ४.५८ टक्के वाढले. आयसीआयसीआय बँक सर्वोच्च स्थानी राहिली. आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. जपानचा निक्केई 0.३८ टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँग सेंग
१.५५ टक्क्यांनी तर शांघाय कंपोजिट १.४0 टक्क्यांनी वाढला.
युरोपीय बाजारांत सकाळी तेजी होती. लंडनचा एफटीएसई, पॅरिसचा कॅक-४0 आणि फ्रँकफर्टचा डॅक्स-३0 हे निर्देशांक १.२१ टक्क्यांपर्यंत तेजीत चालले होते. (प्रतिनिधी)
>१,९0५ कंपन्यांचे समभाग वधारले
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २८ कंपन्यांचे समभाग वाढले. ओएनजीसी आणि एशियन पेंट्स यांचेच समभाग घसरले.
दुसऱ्या रांगेतील समभागांनाही चांगली मागणी राहिली. बाजाराची एकूण उलाढाल सकारात्मक राहिली. १,९0५ कंपन्यांचे समभाग वाढले. ९२६ कंपन्यांचे समभाग घसरले. २0६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.
पाच महिन्यांतील सर्वात मोठी उसळी
जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारातील जोरदार खरेदी या बळावर मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पाच महिन्यांतील सर्वांत मोठी उसळी घेतली.
By admin | Published: October 19, 2016 06:50 AM2016-10-19T06:50:43+5:302016-10-19T06:50:43+5:30