Lokmat Money > बिझनेस न्यूज > YouTube च्या पैशातून बिहारी मुलानं घेतली ५० लाखांची कार, तुम्हीही अशी करू शकता बंपर कमाई

YouTube च्या पैशातून बिहारी मुलानं घेतली ५० लाखांची कार, तुम्हीही अशी करू शकता बंपर कमाई

यूट्यूबच्या कमाईतून एका बिहारी मुलाने 50 लाखांची कार खरेदी केली. YouTube आता फक्त मनोरंजनासाठी राहिलेले नाही. यातून तुम्ही बंपर कमाई देखील करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:45 PM2023-01-17T13:45:34+5:302023-01-17T13:46:21+5:30

यूट्यूबच्या कमाईतून एका बिहारी मुलाने 50 लाखांची कार खरेदी केली. YouTube आता फक्त मनोरंजनासाठी राहिलेले नाही. यातून तुम्ही बंपर कमाई देखील करू शकता.

Bihari boy bought a car worth 50 lakhs with YouTube money you too can make bumper earnings like this money making tips | YouTube च्या पैशातून बिहारी मुलानं घेतली ५० लाखांची कार, तुम्हीही अशी करू शकता बंपर कमाई

YouTube च्या पैशातून बिहारी मुलानं घेतली ५० लाखांची कार, तुम्हीही अशी करू शकता बंपर कमाई

YouTube हे आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यातून लोकांची बंपर कमाईही होत आहे. अनेक जण यातून बंपर कमाई करत आहेत. हर्ष राजपूत नावाच्या एका युट्यूबरने नुकतीच यूट्यूबच्या कमाईतून कार खरेदी केल्याची माहितीही समोर आली होती. 

तो कॉमेडी व्हिडीओ तयार करतो आणि त्याचे तब्बल 3.5 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. त्यानं नुकतीच 50 लाखांची ऑडी खरेदी केल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलंय. इतकंच नाही तर त्यानं आपलं लोनही फेडलं आणि घराचा लिलाव होण्यापासून वाचवलं. रिपोर्टनुसार त्याची महिन्याला 4.5 लाखांची कमाई होते.  

जर आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला आवडत असेल आणि आपण सातत्याने आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असाल, तर हे आपले प्रोफेशनही बनू शकते. मग हे आपल्याला पार्ट टाईम ठेवायचे आहे, की फुल टाईम करायचे आहे, हे आपल्यावर अवलंबून असेल. यासाठी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपण या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने महिन्याला 100000 रुपयांपर्यंत अथवा त्याहूनही अधिकची कमाई करू शकता, तेही घरबसल्या यूट्यूबर केवळ एकतास वेळ देऊन. आपल्याला या केवळ गप्पा वाटत असतील, तर तसे नाही. हे सत्य आहे. आपणही यूट्यूबचा वापर करून एवढे पैसे कमवू शकता.

कशापद्धतीने करता येईल कमाई - यूट्यूबच्या माध्यमाने कमाई करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर अपलोड करावे लागतील. हे कुठलेही सामान्य व्हिडिओ नसतील, तर यात आपले कौशल्य आणि काही विशेष असेल. यानंतर आपण यातून लाखो रुपये कमवू शकता. जर आपल्याला हे करण्याचा योग्य मार्ग माहित नसेल तर, आज आम्ही आपल्याला YouTube व्हिडिओ बनवण्याची सर्वोत्तम पद्धत सांगणार आहोत.

बेस्ट व्हिडिओ क्वालिटी आवश्यक - आपल्या YouTube व्हिडिओंची क्वालिटी उत्कृष्ट असेल तर साहजिकच लोक तो अधिकाधिक पाहतील आणि आपले एंगेजमेंटही वाढेल. मात्र, हा व्हिडिओ खराब दर्जाचा असेल, तर अशा व्हिडिओमधून कमाईची संधीही कमी होईल.

कंटेंट दमदार असावा - यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ तयार करताना आपल्याला नेहमीच चांगल्या कंटेंटवर आणि विषयांवर काम करावे लागेल. कारण चांगला कंटेटच अधिकाधीक लोकांना आल्याशी जोडेल. यामुळे आपले युजर्सदेखील वाढतील आणि आपल्याला व्ह्यूज देखील चांगले मिळतील.

व्हिडिओ 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा नसावा - आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ तयार करत असाल आणि पैसे कमावणे हाच याचा हेतू असले, तर आपल्या व्हिडिओची साईट 3 मिनिटांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. कारण आपल्या व्हिडिओची साईज 3 मिनिटांपेक्षा कमी असेल, तर आपल्याला या व्हिडिओपासून कमाई करता येणार नाही. यामुळे आपला व्हिडिओ नेहमीच 3 मिनिटांपेक्षा अधिक मोठा असणे आवश्यक आहे.

सातत्य आवश्यक - सुरुवातीला आपण एका दिवसात एक व्हिडिओ पोस्ट करू शकता. मात्र, आपल्याला अधिक एंगेजमेंट हवे असेल, तर आपण रोज किमान दोन व्हिडियो पोस्ट करायला हवेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, यात सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा एंगेजमेंट कमी होईल.

Web Title: Bihari boy bought a car worth 50 lakhs with YouTube money you too can make bumper earnings like this money making tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.