मिठाई आणि स्नॅक्स बनवणारी कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल (Bikaji Foods International) लवकरच IPO घेऊन येत आहे. कंपनी यासाठी शेअर बाजार नियामक SEBI कडे ड्राफ्ट पेपर(Draft Red Herring Prospectus) दाखल करणार आहे. आयपीओसाठी बाजारातून 1,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. या IPO द्वारे कंपनीला एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7500 कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळण्याची अपेक्षा आहे.
कंपनीने आयपीओसाठी बँकर म्हणून IIFL सिक्युरिटीजची नियुक्ती केली आहे. आयपीओ मुख्यत्वे विद्यमान गुंतवणूकदारांकडून ऑफर फॉर सेलसाठी भागविक्री करेल. लाइटहाउस फंड्स, आयआयएफएल, एवेंडस आणि एक्सिस या प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांची बिकाजी फूड्स इंटरनॅशनलमध्ये गुंतवणूक आहे. बिकाजी फूड्सचे राजस्थान, आसाम, कर्नाटक येथे सहा उत्पादन कारखाने आहेत.
बिकाजी फूड्स भुजिया, नमकीन, पापड, मिठाई बनवते. कंपनीचे प्रमोटर शिव रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल यांच्याकडे 2020 आर्थिक वर्षाच्या अखेरीस 78.8 टक्के हिस्सा होता. IPO मधून उभारलेल्या पैशातून कंपनी विस्तार योजना राबवेल तसेच नवीन उत्पादने लाँच करेल असा विश्वास आहे. 2020 आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीचा महसूल 1073 कोटी रुपये होता. कंपनीच्या एकूण विक्रीत नमकीनचा वाटा 37 टक्के, भुजियाचा 32 टक्के, मिठाईचा 14 टक्के आणि पापडांचा 10 टक्के वाटा होता.