Lokmat Money > बिझनेस न्यूज > दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:21 PM2024-10-04T13:21:08+5:302024-10-04T13:23:40+5:30

Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते.

bike buyer guide things to keep in mind before getting bike insurance | दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

दसऱ्याला नवीकोरी गाडी घेताय? मग Bike Insurance घेताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

Bike Insurance : तुमची पहिली कार किंवा बाईक खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा क्षण असतो. येत्या दसऱ्याला तुमच्याही मनात असा विचार असेल. तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. बाईक खरेदी केल्यानंतर, रस्त्यावर उतरण्यापूर्वी तुम्हाला थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्स पॉलिसी काढावी लागते. सोबत तुमच्या बाईकचाही विमा उतरवा लागतो. जेणेकरुन अपघात झाल्यास कंपनी नुकसान भरपाई देते. अशा परिस्थितीत तुम्हाला बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेताना काय काळजी घ्यावी? हे माहित असणे आवश्यक आहे.

विमा संरक्षणाबद्दल जाणून घ्या
बाईकचा विमा तुलनेत महाग असतो. कारण त्याची देखभाल करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. अनेकजण आधी बाईक विकत घेतात आणि नंतर तिचा विमा खरेदी करतात. जर तुम्हाला बाईक विम्याबद्दल आधीच माहिती असेल तर तुमचा बराच वेळ आणि पैसा वाचू शकतो.

कव्हरेजमध्ये काय समाविष्ट आहे?
बाईकचा कोणताही विमा घेण्यापूर्वी त्यात किती आणि कोणते कव्हरेज समाविष्ट आहे हे नक्की पाहा. अपघात झाल्यास विमा कंपनीकडून तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळेल हे तपासले पाहिजे. विम्याचे संपूर्ण कव्हरेज केवळ तुम्हाला आणि तुमच्या बाईकला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी कव्हर करत नाही. तर तुम्हाला पूर्णपणे टेन्शन फ्री देखील ठेवते. कोणताही अपघात झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

एक्स्ट्रा कव्हरेजबद्दल जाणून घ्या
जर तुमच्याकडे महागडी बाईक असेल तर तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीमध्ये त्यासाठी अतिरिक्त कव्हरेज घेऊ शकता. विमा पॉलिसीमध्ये झिरो डेप्रिसिएशन कव्हर सारख्या गोष्टी समाविष्ट आहेत की नाही हे तपासा. हे असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बाईकसाठी नुकसानभरपाईचा दावा करण्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जर तुमची बाईक ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीची असेल तर तुम्हाला हे नक्कीच मिळेल.

आयडीव्ही बरोबर तपासा
बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेताना, तुम्हाला योग्य विमा घोषित मूल्य (IDV) माहित असणे आवश्यक आहे. तुमची बाईक चोरीला गेल्यास किंवा पूर्णपणे खराब झाल्यास तुमचा विमाकर्ता तुम्हाला ही रक्कम देतो. नवी बाईकसाठी IDV ची चिंता नसते. मात्र, विमा नूतनीकरणादरम्यान हे माहित असणे आवश्यक आहे.

केवळ प्रीमियमच्या आधारावर पॉलिसी निवडू नका
तुम्ही केवळ प्रीमियमच्या आधारावर बाइक विमा निवडू नका. तुमच्यासाठी सर्वात अनुकूल असलेली विमा पॉलिसी निवडणे कधीही शहाणपणाचे ठरले. कॅशलेससाठी झिरो डेप्रिसिएशन, कंज्यूमेबल खर्च अशा गोष्टी असलेलाच विमा घ्या. तुम्ही तुमची पॉलिसी केवळ प्रीमियमच्या आधारावर निवडणे टाळावे. कारण सेवा आणि अनुभव हे देखील महत्त्वाचे घटक आहेत.

Web Title: bike buyer guide things to keep in mind before getting bike insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.