Join us  

तेच ते...! सावजी ढोलकियांनी नातवाला मजुरी करायला पाठवले, वेटर म्हणून भांडीही घासायला लावली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:26 PM

रुविन ढोलकिया यांनी एकेकाळी चेन्नईत नोकरीही केली आहे.

डायमंड नगरी सुरत येथील उद्योगपती सावजी ढोलकिया नेहमी चर्चेत असतात. दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात कार तसेच फ्लॅट सोनं अशा वस्तु ते भेट देत असतात. देशातील सर्वात मोठा दानशुर उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. सावजी ढोकलिया यांची नेटवर्थ १.५ मिलियन अब्ज डॉलर म्हणजेच १२ हजार कोटी आहे, आता ते वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. ढोलकिया यांच्या नातवाच्या कारणामुळे पुन्हा ते चर्चेत आले आहेत. 

Interest On FD : 'या' बँका देतायत FD वर ९.१% चा बंपर रिटर्न, पैसा कमावण्याची आहे संधी

उद्योगपती ढोलकिया यांचा नातू रुविन ढोलकिया यांनी अमेरिकेतून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात आले पण ढोलकिया यांनी त्यांना आपल्या व्यवसायात काम करु न देता बाहेरच्या कंपनीत नोकरी करण्याचा सल्ला दिला. यासाठी त्यांना चेन्नई येथे पाठवले. बिझनेस स्कूलमध्ये जे शिकवले जाते त्यापलीकडे  वास्तविक जीवनाचे वास्तविक व्यवस्थापन शिक्षण देणे हा यामागचा उद्देश होता.

आजोबांच्या सांगण्यावरून रुविन ढोलकिया ३० जून रोजी सुरतहून चेन्नईला रवाना झाले. यावेळी त्यांना त्यांची ओळख उघड न करण्याचे सांगण्यात आले होते. मोबाईल फोन वापरण्यासही नकार देण्यात आला आणि त्यांना फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी ६००० रुपयांची रक्कम  देण्यात आली.

चेन्नईला पोहोचल्यानंतर रुविन यांना पहिल्यांदा नोकरी शोधण्यासाठी सामना करावा लागला. अनेक ठिकाणी त्यांना नकाराचा सामना करावा लागला. अखेर त्यांना एका कपड्यांच्या शोरुममध्ये सेल्समनची नोकरी मिळाली. चेन्नईतील हायकोर्ट मेट्रो स्टेशनजवळ असणाऱ्या एका शोरुममध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. येथे त्यांनी सेल्समनचा अनुभव घेतला. यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटरचीही नोकरी केली, हॉटेलमध्ये त्यांनी प्लेट धुण्यापासून अनेक काम केलीत. यानंतर त्यांना एका घड्याळ विक्रीच्या दुकानातही काम केले. रुविन यांनी शेवटची नोकरी एका बॅग विक्रिच्या शोरुममध्ये केली. 

त्यांनी ३० दिवसांची नोकरी चेन्नईमध्ये केली. या दरम्यान ते चेन्नईतील साध्या विद्यार्थी निवासमध्ये रहायचे, त्यांना रोज फक्त २०० रुपयेच खर्च करायचे होते.  एकवेळचेचं जेवणही करायचे. 

रुविन यांनी दिलेल्या माहितीनुसार, याकडे दैनंदिन आव्हाने म्हणून पाहण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या वाढीसाठी संधी म्हणून पाहिले. त्यांच्या सामान्य जीवनाच्या अनुभवाने त्यांना आवश्यकतेचे मूल्य पूर्णपणे स्वीकारण्याची परवानगी दिली. आपल्या ३० दिवसांचा अनुभव सांगताना रुविन म्हणाले, जेव्हा  नोकरीसाठी नकार मिळायचा तेव्हा 'नाही' ची वेदना समजली. आयुष्यात कमतरता जाणवली. यावेळी, हॉटेलमध्ये वेटरच्या नोकरीच्या काळात त्याला २७ रुपयांची टीप मिळाली, तो क्षण माझ्यासाठी सर्वात खास होता. २७ रुपये मला करोडो रुपयांची भावना देत होती, असंही रुविन सांगतात. 

हॉटेलमधील नोकरी सोडताना त्यांना हॉटेलमालकाने पगारासाठी ६ तास उभे करून २००० रुपये दिले. तेव्हाच  कष्टकरी लोकांशी वागण्याचा धडा मिळाला. तसेच पिशवीच्या दुकानात मजूर म्हणून काम करत असताना १०-११ तास जमिनीवर बसून काम केले आणि कामाचे महत्त्व कळले. रुविन देवाचे आभार मानतो की, देवाने त्यांना अशा कुटुंबात जन्म दिला, जिथे त्यांना चांगले शिक्षण आणि संगोपन मिळाले. या खडतर प्रवासात रुविनने ८,६०० रुपये कमावले. रुविन यांचा हा प्रवास ३० जुलै रोजी संपला, तिथे त्यांच्या आगमनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रिसेप्शनचे आयोजन केले होते.

टॅग्स :व्यवसाय